साडेचार वर्षांच्या बालीकेवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट

सार्वजनिक आरोग्य विभागातील सहावी यशस्वी शस्त्रक्रिया

अमरावती/26 जुलै-विभागीय संदर्भ सेवा (सुपर स्पेशालिटी ) रुग्णालयामध्ये साडेचार वर्षांच्या बालिकेवर अत्यंत महत्त्वपूर्ण व आव्हानात्मक कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. ही शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागातील सहावी यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी ठरली असून, बालिकेला नव्या ऐकू येण्याच्या जगाची दारे खुली झाली आहेत. सदर रुग्ण ही चार वर्षांवरील असल्याने कुठल्याही योजने मध्ये बसत नसल्यामुळे या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण निधी ची उपलब्धता अमरावती जिल्हा नियोजन समिती मार्फत केलेली आहे व शस्त्रक्रियेनंतर स्पीच थेरपी मध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पुढील एक वर्ष स्पीच थेरपी विनामूल्य करण्यात येणार आहे. या योजनेतून रुग्णाला दोन्ही योजनांच्या माध्यमातून शस्त्रक्रिया व स्पीच थेरपी याचा लाभ विनामूल्य मिळणार आहे.
सदर रुग्ण ही नवसारी, अमरावती येथील रहिवाशी असून जन्मतः ती ऐकण्यास अक्षम होती. रुग्ण दोन वर्षाची झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांना समजले की ती ऐकू शकत नाही . सुरुवातीला रुग्णास पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे दाखवण्यात आले व काही दिवसांपूर्वी ऑडिओ लॉजिस्ट लक्ष्मण मोरे यांच्याकडे उपचार चालू होता तसेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले असता , तेथील शस्त्रक्रियेचा खर्च जास्त असल्यामुळे खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्यामुळे व सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अमरावती येथे कॉक्लियर इम्प्लांट च्या पाच यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णास सूपर स्पेशालिटी हॉस्पिटलला शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आले. सूपर स्पेशालिटी रुग्णालयात रुग्णाच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या व रुग्णास ऑडिओलॉजिस्ट लक्ष्मण मोरे यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले व तदनंतर शेवटी दिनांक 21 जुन 2026 रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर शस्त्रक्रिये मधे पारंपारिक तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.
सदर जटिल शस्त्रक्रिया रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ .अमोल नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. जीवन वेदी , नाक-कान- घसा तज्ञ डॉ. क्षितिज पाटील, डॉ रितेश शेलकर व सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे तसेच विशेष कार्य अधिकारी इ.एन.टी सर्जन डॉ. मंगेश मेंढे ,ऑडियोलॉजिस्ट लक्ष्मण मोरे, बालरोग तज्ञ डॉ नितीन बर्डिया , बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. चेतन रोंधे, डॉ. रमणीका ढोमणे, रेडिओलॉजिस्ट डॉ. शशांक दूरशेट्टीवार, यांच्या मार्फत करण्यात आली. सदर शस्त्रक्रिये मधे वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला मोहोड, समाजसेवा अधीक्षक शितल बोंडे, ऋषिकेश धस, डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यांनी मुंदाने, नेहा लासूरकर,अधिसेविका चंदा खोडके, मालती प्रधान यांच्या सूचनेनुसार न्यूरो इंचार्ज सिस्टर दिपाली देशमुख, अलका मोहोड ,वैशाली नागराळे, मनीषा रामटेके, दीपिका वाटोडकर,विजय गवई, यश गवई, शुभम गवई, अभिषेक निचत,राहुल वायझाडे, शितल सानप, सुचिता खराते, लीना ठाकरे, ज्योत्स्ना खोब्रागडे, आदिती तिथे, स्नेहा राठोड, संगम उमरे, नीलिमा तायडे, पुष्पा तायडे, शुभांगी टीगणे, प्रतीक्षा भगत, स्वाती घवले, ज्योत्स्ना कांबळे, मनीषा कान्हेरकर, सिद्धार्थ उगले ,फार्मासिस्ट योगेश वाडेकर, बायोमेडिकल इंजिनिअर अमोल वाडेकर, प्रशांत शिरे , आकाश काळे, वेदांत इंदुरकर, ज्ञानेश लांजेवर, राहुल कवनपुरे , नंदनलाल राठोड,यांचे शस्त्रक्रियेत विशेष सहकार्य होते.

संबंधित बातम्या

Back to top button