तिवसा-चिखदर्‍यात महाराजस्व अभियान उत्साहात

पालकमंत्री बावनकुळे यांची एकाच दिवशी तीन महाराजस्व शिबिरांना उपस्थिती

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मान्यवरांनी दिली माहित

अमरावती/23 जुलै- शासकीय सेवा नागरिकांपर्यंत पोहोचून देण्यासाठी राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना विविध सोयी या उपक्रमात उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. जिल्ह्यात आज एकाच दिवशी तिवसा, अमरावतीआणि चिखलदरा या तीन ठिकाणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराजस्व शिबिराला भेट दिली. तिवसा येथील कार्यक्रमात पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन राबविण्यासाठी महाराजस्व शिबिर घेण्यात येत आहे. शेतकर्‍यांसाठी कर्जमुक्ती आणि विज बिल माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार या आश्वासनांच्या पूर्तता करणे सुरू झाले आहे. 35 लाख शेतकर्‍यांची कर्जमुक्ती होणार असून पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. तसेच गेल्या पंधरा वर्षातील विज बिल माफ करण्यात आले असून याचा लाभ 45 लाख शेतकर्‍यांना होणार आहे. शेतकर्‍यांना फायद्याचे ठरणारे पांदण रस्ते राबविण्यावर भर देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात राबविण्यात आलेला महसुली तंटामुक्त गाव अभियान राज्यस्तरावर राबविण्यात येणार आहे. यामुळे गावातील तंटे कमी होण्यास मदत होईल. त्यासोबतच शेतीमध्ये काम करणार्‍या मजुरांनाही शेतकर्‍यांचा दर्जा देण्यात येणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना मिळणारे सर्व लाभ त्यांना मिळू शकतील. जिल्ह्यातील बोगस बियाण्याबाबत कठोर कारवाई करण्यात आली असून कंपनीविरुद्ध 35 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच शेतकर्‍यांना नुकसान भरपाई आणि दुबार पेरणीसाठी मदत दिली जाणार आहे, असे सांगितले.
तिवसा येथील कार्यक्रमाला आमदार प्रविण पोटे, राजेश वानखेडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. अमरावती येथील कार्यक्रमात इर्विन चौकातील जमीन संपादन करण्यास यश मिळाले असून या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वांग सुंदर स्मृतीस्थळ उभारण्यात येणार आहे. यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याठिकाणी असलेली जागा लवकर तब्येत घेऊन विदर्भातील सुंदर स्थळ उभारण्यात येईल. त्यासोबतच अमरावती शहरात सीसीटीव्हीचे जाळे विणण्यात येणार असून अमरावती सुरक्षित करण्यावर भर देण्यात येईल, असे सांगितले. अमरावती येथील कार्यक्रमाला आमदार किरण सरनाईक, रवी राणा, नवनीत राणा, महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे आदी उपस्थित होते. चिखलदरा येथील कार्यक्रमात बावनकुळे यांनी मेळघाटसारख्या दुर्गम भागात वीज पोचवण्याचे कार्य करण्यात आले आहे. तसेच 22 गावांसाठी सौरऊर्जेमार्फत वीज पोहोचवण्यासाठी निधी देण्यात आला आहे. त्यासोबतच स्वतंत्र वीज उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. आदिवासींच्या वनपट्ट्यांना नियमित करण्यासाठी सात ई आणि बारा ई मध्ये आणण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यात वनपट्ट्यांबाबत कारवाई करण्यात येणार आहे. मेळघाटच्या विकासासाठी इको टुरिझम विकसित करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निधी देणार आहे. रोजगार निर्मितीसाठी उपाय करण्यात येणार आहे. चिखलदरा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. लवकरच ही कामे पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी आमदार प्रविण पोटे, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखेडे, नवनीत राणा, नगराध्यक्ष शेख अब्दुल उपस्थित होते. महाराजस्व अभियानाच्या निमित्ताने नगरसेवक आल्हाद कलोती यांच्या संकल्पनेतून चिखलदरा येथे हृदयरोग तपासणी करण्यात आली. यात एक ते अठरा वयोगटातील 15 हजार रुग्णांची टुडी इको तपासणी करण्यात आली. यातील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना पूर्ण मदत केली जाणार असून उपचाराचा खर्च शासनातर्फे केला जाणार आहे. जिल्ह्यातील आजच्या तीनही महाराजस्व अभियानात योजनेतील लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात लाभाचे वाटप करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button