पारधी समाजाच्या बेरोजगार युवक-युवतींना ऑटोचे वाटप

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा पुढाकार

अमरावती/21 जुलै – दिनांक 19/7/2026 रोजी चींतामनी प्रोडक्शन प्राईव्हेट लीमीटेड एम.आय.डी.सी. अमरावती येथे एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प धारणीच्या वतीने पारधी पॅकेज योजना अंतर्गत आदिवासी पारधी बेरोजगार युवक-युवतींना मंजूर केलेल्या टोचे
नुकतेच वितरण डॅा.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण व राज्य महासचिव आदिवासी पारधी विकास परिषद महाराष्ट्र यांचे हस्ते लाभार्थ्यांना अँटोचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी चिंतामणी प्रोडक्शन प्रायव्हेट लिमीटेड, अमरावतीचे सुरज वाघमारे, सोनु
चिंतामणी यांच्या वतीने डॅा. शिवलाल पवार, राज्य महासचिव व जिल्हाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यातआला. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी च्या वतीने पारधी पॅकेज अंतर्गत साधना रमेश सोळंके, अमरावती, अजय विनायकराव चव्हाण, मेघनाथपूर, राजेश पवार दर्यापूर या लाभार्थ्यांना मंजुर केलेले टो डॅा. शिवलाल पवार, राज्य महासचिव व जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार यांच्या हस्ते सुरज वाघमारे, सोनु चिंतामणी यांच्या उपस्थितीत टोचे वितरण करण्यात आले. सत्कारप्रसंगी डॅा. शिवलाल पवार यांनी आदिवासी पारधी विकास परिषदेच्या वतीने शासनाला पारधी पॅकेज योजनेअंतर्गत विविध योजना राबविण्याकरीता वारंवार दिलेल्या प्रस्तावामुळे तसेच बेरोजगार युवकांना ऑटो मिळण्याबाबत दिलेल्या निवेदनानुसार एकात्मिक आदिवासी प्रकल्प धारणी यांनी पारधी पॅकेज योजनेअंतर्गत पारधी समाजाच्या बेरोजगार युवक, युवतींना टो मंजुर करुन रोजगार उपलब्ध करुन दिल्याबद्दल शासनाचे प्रकल्प अधिकारी यांचे अभिनंदन करुन आभार मानले व टो योजनेबद्दल लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Back to top button