आ.गजानन लवटे यांच्याकडून भव्य ‘शिवसृष्टी’ साठी 90.60 लाखांचा निधी मंजूर

अंजनगाव सुर्जीच्या वैभवात पडणार भर

लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे रखडलेला प्रश्न दीड वर्षात सुटला

अंजनगाव सुर्जी/2 जुलै : शहरासह संपूर्ण तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दशकांपासून स्थानिक शिवप्रेमी आणि नागरिकांचे स्वप्न असलेल्या भव्य ’शिवसृष्टी’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या निर्मितीला . शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धडाडीचे आमदार गजानन लवटे यांनी आपल्या कार्यकाळातील अवघ्या दीड वर्षात या ऐतिहासिक कामासाठी 90 लक्ष 60 हजार रुपयांचा भरीव निधी प्रस्तावित आहे. या नावीन्यपूर्ण कामाचे अधिकृत पत्र आमदार लवटे यांनी नगरसेवक सुयोग खाडे यांच्याकडे सुपूर्द केले असून, यामुळे शहराच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडणार आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर
अंजनगाव सुर्जी शहरामध्ये आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक भव्य आणि देखणा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा, यासाठी शहरातील तसेच तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना, शिवप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांनी वेगवेगळ्या पातळीवर अनेक वर्षांपासून मोठे प्रयत्न केले. मोर्चे, निवेदने आणि आंदोलने याद्वारे हा प्रश्न लावून धरण्यात आला होता. परंतु, पुतळा बसवण्यासाठी योग्य जागेचा शोध घेणे, तांत्रिक परवानग्या मिळवणे आणि कोट्यवधींचा निधी जमा करणे, या सर्व अडचणींमुळे हा विषय लांबतच गेला.आजवर दर्यापूर मतदारसंघातून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले आणि त्यांनी सत्ता उपभोगली. परंतु, निवडून आल्यानंतर या लोकप्रतिनिधींनी शिवप्रेमींच्या या भावनेला आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाला कधीच गांभीर्याने घेतले नाही, अशी खंत नागरिक व्यक्त करत होते. मात्र, आमदार गजानन लवटे यांनी निवडणुकीत दिलेला शब्द पाळत अवघ्या दीड वर्षात एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.या भव्य शिवसृष्टी प्रकल्पासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या पंचायत समितीची जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. ही जागा सर्व नागरिकांसाठी सोयीची आणि भव्य प्रकल्पासाठी अत्यंत योग्य मानली जात आहे. विशेष म्हणजे आमदारांनी स्वाक्षरी करताच उपस्थित असलेल्या सर्व शिवप्रेमींनी आणि कार्यकर्त्यांनी ’जय भवानी, जय शिवाजी’ आणि ’छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या, ज्यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. या प्रसंगी बोलताना भावुक झाले होते. ते म्हणाले, अंजनगाव सुर्जी शहरात छत्रपती शिवरायांची एक भव्य आणि आदर्श शिवसृष्टी उभी करणे हे माझे जुने आणि मनापासूनचे स्वप्न आहे. आज या स्वप्नपूर्तीची पहिली पायरी आपण पार केली आहे. 90 लाख 60 हजारांचा निधी हा केवळ सुरुवात असून, या पवित्र आणि ऐतिहासिक कार्यासाठी भविष्यात निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. ही शिवसृष्टी कशी असावी, याचा निर्णय केबिनमध्ये बसून होणार नाही. तालुक्यातील सर्वच शिवप्रेमी, इतिहासकार, विविध संघटना आणि ज्येष्ठ नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्या सूचना घेऊनच या शिवसृष्टीची अत्यंत देखणी, प्रेक्षणीय आणि भव्य निर्मिती केली जाईल.

संबंधित बातम्या

Back to top button