सोनोग्राफीद्वारे गैरप्रकार करणार्यांवर मकोका लावणार
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची विधानसभेत घोषणा

मुंबई/1 जुलै- समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि इतर सदस्यांनी आज बुधवारी (1 जुलै) राज्यात बोकाळलेल्या विनापरवाना खतऋ केंद्रे आणि सोनोग्राफीच्या माध्यमातून होणार्या गैरप्रकारांचा मुद्दा उपस्थित केला. रुग्णांच्या जिवाशी होणारा हा खेळ थांबवण्याची मागणी सदस्यांनी केली. यावर आरोग्यमंत्र्यांनी काही प्रमुख आश्वासने दिली.
यामध्ये खतऋ सेंटर, सोनोग्राफीद्वारे गैरप्रकार करणार्यांवर मकोका लावणार, असल्याची माहिती मंत्री आबिटकरांनी दिली. पुढील अधिवेशनापर्यंत ही तरतूद केली जाईल, असेही यावेळी त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आता राज्यात वाढत असलेली विनापरवाना ‘इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन’ (खतऋ) केंद्रे, बेकायदेशीर सोनोग्राफी आणि गर्भलिंग निदानाच्या गैरप्रकारांवर राज्य सरकारने आता अत्यंत कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि इतर सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर खतऋ केंद्रांच्या माध्यमातून चालणार्या संघटित रॅकेटला आळा घालण्यासाठी विद्यमान कायदे अधिक कडक केले जातील. पुढील अधिवेशनात अशा गुन्हेगारांवर चउजउ- लावण्याची तरतूद केली जाईल. तर, (गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व निदान तंत्र) कायदा, तसेच खतऋ आणि सोनोग्राफी केंद्रांच्या कडक तपासणीसाठी आणि नियमनासाठी राज्यात एक ‘विशेष कृती दल’ स्थापन करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणार्या केंद्रांवर कठोर कारवाई केली जाईल. यावेळी काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर सरकारचे लक्ष वेधले.




