ऑपरेशन सिंदूर मोहिमेतील वीरांचा राष्ट्रपतींच्याहस्ते सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती

नवी दिल्ली/29 जून: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित संरक्षण अलंकरण समारंभात देशातील शूर जवानांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात 7 कीर्ती चक्र, 15 वीर चक्र आणि 29 शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.
या समारंभातून भारतीय सैन्य, हवाई दल आणि पोलिस दलातील जवानांच्या अतुलनीय धैर्याला राष्ट्राने सलाम केला. विविध मोहिमांतील त्यांच्या कामगिरीमुळे देशाच्या सुरक्षेला मोठा हातभार लागल्याचे या सन्मानातून अधोरेखित झाले. यावेळी ऑपरेशन सिंदूरमधील शौर्याला वीर चक्र या सन्मानांमध्ये भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा यांना वीर चक्र प्रदान करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्यांनी सुखोई-30 एमकेआय विमानातून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर झालेल्या हवाई कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वीही त्यांच्या सेवेला मान्यता मिळाली असून त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. लोकेशन ऑफ कंट्रोल परिसरात तीन दहशतवाद्यांना ठार करणार्‍या लेफ्टनंट कर्नल नितेश भारती शुक्ला यांनाही वीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button