नसरापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील नराधमाला फाशी

60 दिवसांत फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

फडणवीसांनी विधानसभेतून मानले न्यायालयाचे आभार

सर्वात जलदगतीने निकाली लागलेला राज्यातील पहिलाच खटला

मुंबई/29 जून- नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी ठरलेला भीमराव कांबळे (65) याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी (25 जून) दोषी ठरवले आहे. आज सोमवारी (29 जून) या प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. वास्तविक या खटल्याचा निकाल 25 जून रोजी अपेक्षित होता. त्यावेळी बाजू मांडण्याची संधी साधून आरोपीनी पुन्हा ‘तो मी नव्हेच’ हेच सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोषी ठरवलेल्या भीमराव कांबळे याला 29 जून रोजी शिक्षा सुनावणार असल्याचे विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दुपारी सव्वा बारा वाजता सांगितले. त्यानुसार आज आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिले. यावेळी त्यांनी न्यायालयाचे आभार मानत या कारवाईची माहिती दिली. नसरापूर प्रकरणी विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 1 मे 2026 रोजी पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अतिशय वाईट घटना घडली होती. ज्यामध्ये तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. 2 मे 2026 रोजी या प्रकरणी एफआरआय दाखल झाला आणि तत्काळ आरोपीला अटक करण्यात आली. यामध्ये केवळ 14 दिवसांमध्ये 16 मे 2026 ला पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर 28 मे 2026 रोजी न्यायालयासमोर आरोप निश्चिती झाली. 26 मे 2026 ला पहिली साक्ष नोंदवण्यात आली आणि केवळ 16 दिवसांमध्ये 55 साक्षीदारांची तपासणी, उलट तपासणी या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. त्यानंतर 25 जून 2026 ला सदर आरोपीला त्या ठिकाणी दोषी म्हणून जाहीर केले. म्हणजे जवळपास घटना घडल्यानंतर 55 व्या दिवशी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आणि त्यानंतर 29 जून म्हणजे आज आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा न्यायालयाने दिलेली आहे. केवळ 29 दिवसांमध्ये 55 साक्षीदार तपासून सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button