पंकज पवार विरोधात फौजदारी गुन्हा दाखल

भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन उपअधीक्षक

सरकारी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप; सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई

अकोला /3 जून: अकोल्यातील भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेले तथा सध्या निलंबित असलेले पंकज पवार यांच्याविरोधात सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शास कीय पदावर कार्यरत अस ताना अधि कारांचा गैरवापर करून विविध अनिय मितता केल्याचा आरोप त्यांच्या वर ठेवण्यात आला आहे. सिटी कोत वाली पोलिस ठा ण्याच्या माहिती नुसार, पंकज पवार यांनी 1 जून 2023 ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीत पदावर असताना शासनाने सोप विलेल्या जबाबदार्‍यांचा गैरवापर केल्याचे तपासात समोर आलेआहे. त्यांनी पदाचा गैरवापर करून 15 प्रकरणां मध्ये स्वाधिकारा तील मिळकतींचे स्वरूप बदलणे, मृत खातेदारांच्या नावाने अर्ज स्वीकारणे, अस्तित्वात नसतानाही भाडेतत्त्वावरील मिळकत पत्रिका तयार करणे, सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित असलेल्या जमिनी खाजगी व्यक्तींच्या नावावर करण्याचा प्रयत्न करणे तसेच अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन प्रमाणपत्रे देणे अशा विविध अनियमितता केल्याचा आरोप आहे.या प्रकारामुळे शासनाचा विश्वासघात झाला असून शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालया कडून सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 2 जून 2026 रोजी पंकज पवार यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. सदर प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अजित इंगोले हे पुढील तपास करीत आहेत

संबंधित बातम्या

Back to top button