एक हात मदतीचा; प्रभात चौकातून निराधार वृद्धाचे आधार
अमरावती महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम

अमरावती /18 मे: 46 ओ सेल्सिअस तापमानात, प्रभात टॉकीजवळ आज दुपारी 2 वाजता कडक उन्हात एक निराधार वृद्ध रस्त्यावर थरथर कापत पडून होता. स्थानिक व्यावसायिकाने आधार केंद्राला कॉल करून सांगितले, व्यक्ती गंभीर अवस्थेत आहे, काहीही होऊ शकते.
माहिती मिळताच आधार केंद्राची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि त्या वृद्धाला सुरक्षितपणे केंद्रात आणले. केंद्रात आणल्यानंतर दिसले चित्र हेलावून टाकणारे होते. त्या व्यक्तीने कदाचित कित्येक वर्षांपासून आंघोळ केली नव्हती, अंगावर जवळपास 200 ग्रॅम मळ साचला होता. आधार केंद्राचे संचालक राजीव बसवनाथे, व्यवस्थापक ज्योती राठोड आणि काळजीवाहक रोहित घोंगडे यांनी कोणतीही अडचण न बाळगता त्या आजोबांना आंघोळ घातली, स्वच्छ कपडे दिले आणि आवश्यक काळजी घेतली. आता आजोबा स्वच्छ, टेन्शन फ्री आणि आनंदी दिसत आहेत. आधार केंद्राने पुन्हा एकदा माणुसकीचे जिवंत दर्शन घडवले.




