शिवराज मोटेगावकरने 10 दिवस आधीच मिळवला होता छएएढ चा पेपर
रॅकेटचा सक्रिय सदस्य असल्याचे उघड

मोटेगावकरला 9 दिवसांची उइख कोठडी
लातूर/18 मे– NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता जुळू लागले आहेत. या प्रकरणात आधी रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि नंतर वनस्पतिशास्त्र लेक्चरर मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली. आता छएएढ परीक्षा घेणार्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (छढअ) च्या अधिकार्याचाही सहभाग असल्याचे समोर येत असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे. लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकरला सीबीआयने अटक केल्याचे समोर आले आहे.
शिवराज मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर विशेष सीबीआय कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. अखेर सीबीआय कोर्टाने शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची कोठडी सुनावली आहे. शिवराज मोटेगावकर हे आरसीसी क्लासेसचे संचालक असून आता त्यांची सीबीआयमार्फत चौकशी केली जाणार आहे.
सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडले?- सुनावणीदरम्यान सीबीआय कोर्टात न्यायाधीश आणि तपास अधिकार्यांमध्ये झालेला संवाद महत्त्वाचा ठरला. न्यायाधीशांनी तपास अधिकारी पवन कौशिक यांना थेट प्रश्न विचारला की, मोटेगावकरकडेच प्रश्नपत्रिका आहेत, हे तुम्हाला कसं कळलं? या प्रश्नावर उत्तर देताना तपास अधिकारी कौशिक म्हणाले की, या प्रकरणातील संशयित निवृत्त प्राध्यापक कुलकर्णी हा शिवराज मोटेगावकरच्या सतत संपर्कात होता., त्याद्वारे ही बाब समोर आली आहे. येथील कोचिंग सेंटरमार्फतच प्रश्नपत्रिकांचे वितरण सुरू होते.
कागदपत्रे, इलेक्ट्रोनिक गॅझेट ताब्यात-याबाबत अधिकची माहिती अशी की, नीट पेपरफुटी प्रकरण केवळ राजयपूर्तेच मर्यादेत न राहता देशभरातील मोठे रॅकेट असल्याचे समोर आले आहे. यात अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात प्राध्यापकांचा देखील समावेश आहे. यापूर्वी दोन प्राध्यापकांना सीबीआयने अटक केली होती. आता शिवराज मोटेगावकर यांना देखील अटक करण्यात आली आहे. कारण मोटेगावकर यांचे राज्यभरात नीट परीक्षेसंदर्भात मोठे क्लासेस आहेत. गेल्याच आठवड्यात मोटेगावकर यांचे ज्या ज्या ठिकाणी क्लासेस आहेत त्या ठिकाणी छापेमारी केली होती. यावेळी काही महत्त्वाची कागदपत्रे आणि काही इलेक्ट्रोनिक गॅझेट देखील सीबीआयने ताब्यात घेतली होती.पेपरफुटी करणार्या टोळीतला सदस्य-शिवराज मोटेगावकरला आज सीबीआयने अटक केली असून त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर या संपूर्ण रॅकेटमध्ये मोटेगावकरांचा काय संबंध आहे हे समोर येणार आहे. तसेच जे प्रमुख आरोपी आहेत, लातूरचे पी.व्ही कुलकर्णी, पुण्यातल्या मनीषा मांढरे यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या सर्वांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याचा तपास सीबीआयकडून करण्यात येत आहे. मोटेगावकर हा नीटचे पेपर फोडणार्या टोळीतला सक्रिय सदस्य असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.
परीक्षेच्या 10 दिवस आधीच नीटची प्रश्नपत्रिका-चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, देशभरात 3 मे रोजी नीटची परीक्षा होती. परीक्षेच्या 10 दिवस आधीच म्हणजे 23 एप्रिल रोजीच शिवराज मोटेगावकरने नीटची प्रश्नपत्रिका मिळवली होती. चौकशीत मोटेगावकरच्या मोबाइलमध्येच नीटची प्रश्नपत्रिका आणि उत्तपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे. शिवराज मोटेगावकरने विवेक पाटील नावाच्या एका व्यक्तीला तसेच विद्यार्थ्यांना नीटची प्रश्नपत्रिका पाठवली होती, मात्र तपास यंत्रणेसमोर तो सध्या लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे सांगण्यास टाळाटाळ करत आहे. इतकेच नव्हे तर, स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने परीक्षा संपल्यानंतर या प्रश्नपत्रिकेचे सर्व तांत्रिक पुरावे देखील नष्ट केले असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, हा डेटा तपास यंत्रणांनी रिकव्हर केल्याचे समजते. त्यामुळेच मोटेगावकर गोत्यात आला आहे.
विवेक पाटीलचे नाव समोर-सीबीआयने शिवराज मोटेगावकरला बेड्या ठोकल्या. आता छढ- चे अनेक अधिकारीही रडारवर असल्याचे समजते. एकपेक्षा अधिक अधिकारी पेपरफुटी प्रकरणात असल्याची शक्यता सीबीआयने व्यक्त केली आहे. मोटेगावकरने विवेक पाटील याला नीटची प्रश्नपत्रिका पाठवल्याचे समोर आले आहे. नीट परीक्षेतले प्रश्न पहिल्यांदा हस्ताक्षरातील कॉपीमध्ये उत्तरासह पुढे पाठवण्यात आले.
कोट्यवधींचे व्यवहार झाले-परीक्षेच्या दोन दिवस आधी लातूर, पुणे आणि इतर शहरांतील आलिशान हॉटेल्समध्ये या व्यवहारांच्या गुप्त बैठका होत असल्याची माहितीही तपासातून समोर आली आहे. संबंधित पालकांना हॉटेलच्या खोल्यांमध्ये बोलावले जाई. आत प्रवेश करताच त्यांचे मोबाईल जप्त केले जात होते. त्यानंतर त्यांना कथित लाईव्ह, प्रश्नपत्रिका आणि उत्तरे दाखवली जात होती. अर्धी रक्कम आगाऊ आणि उर्वरित रक्कम परीक्षा झाल्यानंतर देण्याच्या अटीवर कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आल्याचे बोलले जात आहे. अनेक परराज्यांतील ग्राहक या व्यवहारात सहभागी असल्याने तपास यंत्रणांनी विविध राज्यांमध्ये चौकशीचा वेग वाढवला आहे. सीबीआयच्या कारवाईची चाहूल लागताच अनेक श्रीमंत पालकांनी मोबाईल बंद करून संपर्क तोडल्याची माहिती समोर आली आहे. काहींनी पैसे गेले तरी चालतील, पण चौकशी नको, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.
RCC च्या शिक्षकांना लाखोंचा पगार
मोटेगावकर RCC मध्ये शिकवणार्या शिक्षकांना लाखोंचा पगार देत होता. छएएढ आणि गएए च्या क्लासेससाठी तो हिंदी पट्ट्यातील शिक्षक भाडेतत्वावर आणायचा. उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा येथील हे शिक्षक असत. त्यांचा महिन्याचा पगारच लाखोंच्या घरात असल्याचे समजते. तसेच काही शिक्षक तासिका पद्धतीवर येत. त्यांचे मानधन सुद्धा लाखो रुपयांच्या घरात होते. या शिक्षकांच्या बळावरच मोटेगावकरने लातूर आणि नांदेडनंतर थेट पुणे, पिंपर-चिंचवड, हडपसर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अकोला येथे सुद्धा क्लासेस सुरू होते.




