डॉ. राजू व वंदना डांगे दांपत्याचा विवाहाचा वाढदिवस

अमरावती /17 मे: सीताराम बाबा कॉलनी येथील रहिवासी आरोग्य सेवेत कार्यरत अनेक पदवीधारक आंतरराष्ट्रीय योग वर्ग संचालक जेसीआय राष्ट्रीय प्रशिक्षक अनेक पुरस्कारांचे मानकरी ग्रामगीताचार्य डॉ. राजू डांगे व त्यांच्या पत्नी वंदना राजू डांगे दोन्ही सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांच्या 32 व्या विवाहाच्या वाढदिवशी डॉ. गोविंद कासट मित्र मंडळी व प्रवीण वासनिक परिवारातर्फे विवाहाचा पुनर्प्रत्यय थाटामाटात आणून देण्यात आला. वासनिक परिवारातर्फे मातोश्री कमलताई भीमरावजी वासनिक यांचा 80 वा वाढदिवस जेवड नगर येथील सुखशांती वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला. नेमका त्याच दिवशी विवाहाचा वाढदिवस येणार्‍या डांगे दांपत्याला कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले व अगदी आंतरपाठ टाकून मंगलाष्टके म्हणत शुभमंगल सावधान करत एक दुसर्‍याला हार टाकायला लावत व उपस्थित वृद्ध मंडळी समोर विवाहाचा पुनर्प्रत्यय करून देण्यात आला. सर्व आनंदी आनंद वातावरण होते.

संबंधित बातम्या

Back to top button