NEET पेपर लीक, परीक्षा रद्द, उइख चौकशी करणार
22 लाख विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा

13 संशयितांना ताब्यात
नवी दिल्ली/12 मे : देशातील महत्त्वाच्या परीक्षांपैकी महत्त्वाची परीक्षा असलेली छएएढ 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा मानल्या जाणार्या छएएढ परीक्षेबाबत मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पेपर लीकच्या आरोपांनंतर अखेर छएएढ परीक्षा रद्द करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता उइख कडे सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील जवळपास 22 लाख विद्यार्थी चिंतेत आहेत.
राजस्थान स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या प्राथमिक तपासात असे संकेत मिळाले आहेत की, परीक्षेपूर्वीच जवळपास 600 गुणांपर्यंतचे प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले होते. धक्कादायक बाब म्हणजे केवळ प्रश्नच नाही, तर अनेक प्रश्नांचे पर्याय देखील मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. छएएढ 2026 चा पेपर लीक झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. एआय तंत्रज्ञानाच्या काळातही पेपर लीक कसा होतो ? परीक्षेच्या 48 तास आधीच इतक्या महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर विद्यार्थ्यांना कसा मिळतो ? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली. एनटीएने सांगितले की, नीट (यूजी) 2026 परीक्षेसंदर्भात 10 मे 2026 रोजी एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले होते. आता या संस्थेने विद्यार्थी, पालक आणि जनतेला काही नवीन निर्णयांबद्दल माहिती दिली आहे. एनटीएने सांगितले की, परीक्षेची निष्पक्षता आणि सुरक्षा सुनिश्चित करता यावी, यासाठी या प्रकरणाशी संबंधित काही तपास 8 मे 2026 रोजीच केंद्रीय यंत्रणांकडे सोपवण्यात आले होते. तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आणि शासकीय मंजुरीच्या आधारे, एनटीएने 3 मे 2026 रोजी होणारी नीट (यूजी) परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या नवीन तारखा नंतर जाहीर केल्या जातील. तपास यंत्रणांच्या निष्कर्षांनुसार, सध्याची तपास प्रक्रिया पुढे चालू ठेवता येणार नाही, असे निश्चित झाले आहे. त्यामुळे, पारदर्शकता राखण्यासाठी, तपास पुन्हा घेण्यात येईल. प्रश्नपत्रिकेत एकूण 180 प्रश्न सोडवायचे असून प्रत्येक प्रश्नाला 4 गुण आहेत.
नीट यूजी 2026 परीक्षा 3 मे रोजी देशभरात घेण्यात आली. या परीक्षेला देशभरातून 22 लाख विद्यार्थी बसले होते. परीक्षेची प्रश्नपत्रिका वेळेपूर्वीच फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. राजस्थानमधील अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळणारे हस्तलिखित गेस पेपर मिळाले होते, अशी माहिती समोर आली होती. 10 मे रोजी, राजस्थान विशेष कृती गटाने (एसओजी), गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, डेहराडून, सीकर आणि झुंझुनू येथून 13 संशयितांना ताब्यात घेतले. यामध्ये सीकरमधील एका कोचिंग संस्थेशी संबंधित करिअर समुपदेशकाचा समावेश होता30 हजारापासून 5 लाखांपर्यंत ‘पेपर’ विकला गेला?-तपास यंत्रणांच्या सूत्रांनुसार, सुरुवातीला प्रश्नसंच तब्बल 5 लाख रुपयांपर्यंत विकले जात होते. मात्र, परीक्षा जवळ येत गेल्यानंतर त्याची किंमत कमी होत गेली आणि परीक्षेच्या आदल्या रात्री तोच पेपर 30 हजार रुपयांमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
नीट पेपरफुटीचे ‘नाशिक कनेक्शन’; संशयिताला अटक
नीट प्रकरणी संबंधित तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर नाशिक पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तो आरोपी नीट प्रकरणातील असल्याची माहिती मिळाली आहे. या आरोपीला युनिट 2 च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक येणार आहे. ते आल्यानंतर आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. सध्या या प्रकरणाची इतकीच माहिती आहे की, राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीने त्याचा वेष बदलला असल्यामुळे, त्याने स्वतःचे केप कापलेले असल्यामुळे सुरुवातीला त्याची माहिती मिळत नव्हती. मात्र तांत्रिक कौशल्य आणि पोलिसांनी तपास करत त्याला ताब्यात घेतले आहे, संबंधित आरोपीने पेपर इकडून तिकडे देण्यासाठी फक्त मध्यस्थाची भूमिका बजावल्याचा संशय आहे. त्याने 10 लाखांचा पेपर 15 लाखांना विकण्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.असे नाशिक पोलिसांनी सांगितले.




