संगीत साधना कराओके क्लबचा चौथा स्थापना दिवस उत्साहात

अमरावती /28 एप्रिल: शहरातील प्रतिष्ठित संगीत साधना कराओके क्लबचा चौथा स्थापना दिवस मोठ्या उत्साह आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरा केला गेला. या निमित्त आयोजित केलेल्या कराओके गायन स्पर्धा आणि पोशाख स्पर्धेत कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रम संस्मरणीय बनवला.
कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून राजेश तरडेजा संचालक सुचित्रा चिट फंड, नितीनजी कोळी डायरेक्टर ऑफ युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट हेड (परिक्षा), पूरणजी लाल संचालक श्रद्धा मॉल आणि गंगाधर बावणे उपस्थित होते. तसेच विशिष्ट अतिथी म्हणून डॉ. नयना दापूरकर आणि डॉ. मोनिका उमक यांची उपस्थिती उल्लेखनीय राहिली.
निर्णायक म्हणून कामिनी खैरे (गायन) आणि शीतल बावणे (वेशभूषा) यांनी आपली महत्त्वपूर्ण भूमिका निभवली. कार्यक्रमाची सुरुवात क्लबचे संस्थापक चंद्रकांत पोपट यांनी तारों में सज के गाण्याने केली. त्यानंतर त्यांनी सुनिता व्याससह वो है जरा खफा खफा, डॉ. मोनिका उमकसह ये रातें ये मौसम तसेच सह-संचालक प्रकाश तनवानीसह सात अजूबे इस दुनिया में गाणी सादर केली आणि वातावरणाला सुरेल बनवले. परीक्षक कामिनी खैरे यांनी आईये मेहरबान, मुख्य अतिथी नितीन कोली आणि डॉ. मोनिका उमक यांनी आते जाते हंसते गाते, तर डॉ. नयना दापूरकर यांनी आओ हुजूर तुमको गाणं सादर करून प्रेक्षकांकडून भरपूर दाद मिळवली. उषाकिरण विजेकर, विद्या मोहोड, वृषाली काले, गणेश बुंदेले, एकनाथ वाघमारे, सिद्धी सरदार, दिलीप सदार, आनंद डाऊ, राजेश किल्लेकर आणि संदीप बुब यांचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट पोशाख/वेशभूषा पुरस्कार विजेत्यांमध्ये रसिका देशमुख, संजय मुनोत, गीता गुप्ता, मीता नवघरिया, दिलीप मांडवे, नीलिमा देशमुख, डॉ. वासंती कडू, अमृता वाठोडकर, सुरेखा त्यागी आणि कैलाश तिवारी यांना पुरस्कार दिला गेला.कार्यक्रमात सहभागी होणार्‍या इतर सदस्यांमध्ये- दीपक धानोरकर, मिनल हिवराळे आणि दिपक धानोरकर यांनी सांभाळली.

संबंधित बातम्या

Back to top button