अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळला अज्ञाताचा मृतदेह

बेसखेडा ते पोरगव्हाण मार्गावर

वरुड । 29 मार्च – तालुक्यातील बेसखेडा ते पोरगव्हाण मार्गावर अर्धवट जळालेल्या स्थितीत 35 ते 40 वर्षीय अनोळखी ईसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
सदर ईसमाचा खून करुन पेट्रोल टाकून मृतदेह जाळुन टाकला असावा, असा संशय व्यक्त केल्या जात असून आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास पोरगव्हाण येथील महिला मजुर शेतामध्ये काम करण्यास गेल्या असता त्यांच्या निदर्शनास हा मृतदेह आल्यानंतर त्यांनी गावकर्‍यांना फोनव्दारे ही माहीती दिली. वरुड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची टिम सुध्दा घटनास्थळावर दाखल झाली असून मृतदेह कोणाचा? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. परिसरातील कोणी हरविला असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन सुध्दा पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.
सविस्तर माहीतीनुसार, बेसखेडा ते पोरगव्हाण हा रस्ता तसा निर्मनुष्य रस्ता असला तरी या रस्त्याने शेतकर्‍यांच्या शेती असल्यामुळे काही प्रमाणात शेतकरी व मजुरांची ये-जा सुरु असते. त्याचा फायदा घेत काल रात्रीच्या सुमारास 35 ते 40 वर्षे वयोगटातील इमसाचा याच रस्त्याचा खून करण्यात आला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उददेशाने आरोपींनी मृतदेहावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळुन टाकल्याची घटना उघडकीस आली. आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास नरखेड तालुक्यातील रहिवाशी असलेले गुरमुळे यांचे शेताचे शेजारी असलेल्या एका शेतात काम करण्याकरीता पोरगव्हाण येथील महिला मजुर जात असतांना एका ईसमाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत त्या महिलांना आढळुन आला. त्या महिलांनी भ्रमणध्वनीव्दारे गावातील नागरिकांना माहीती दिली. त्यानंतर गावकर्‍यांनी घटनास्थळी चांगलीच गर्दी केली होती, पोलिसांना पाचारण करण्यात आले. वरुड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस सुध्दा घटनास्थळी दाखल झाले. दिवसभर मृतदेह कोणाचा? याचा शोध पोलिसांकडून घेण्यात आला परंतु शोध न लागल्याने अखेर पोलिसांनी परिसरातील कोणी हरविला असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असुन पुढील ठाणेदार अर्जुन ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे. मृतदेह कोणाचा? आणि खून कोणी केला? याचा शोध घेण्याचे आवाहन आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button