राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘सुनेत्रा पर्व’

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड

दादांच्या ’विचारांचा वारसा शेवटपर्यंत जपणार’

मुंबई/26 फेब्रुवारी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा आज सुनेत्रा पवार यांनी अधिकृतपणे स्वीकारली. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची या पदावर एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताना सुनेत्रा पवार अत्यंत भावूक झाल्या होत्या. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही, पण त्यांनी दिलेला विचारांचा वारसा आणि विकासाचा मार्ग मी शेवटपर्यंत जपेल, असा शब्द त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
भाषणाच्या सुरुवातीलाच सुनेत्रा पवार यांनी महापुरुषांना अभिवादन करत पक्षाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, माझ्यावर जो विश्वास तुम्ही टाकला आहे, तो माझ्यासाठी केवळ एक पद नाही, तर लाखो कार्यकर्त्यांच्या आशा-आकांक्षा आणि संघर्षाची जबाबदारी आहे. हा सन्मान माझा नसून तळागाळात काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याचा, माता-भगिनींचा आणि जनमानसाचा आहे. अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार यांना आपला हुंदका आवरता आला नाही. आदरणीय दादा आज आपल्यात नाहीत, हे मन मानायला तयार नाही. त्यांचा मृत्यू हा एक मोठा आघात आहे. 30 जून 2023 रोजी त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. अवघ्या अडीच वर्षांच्या काळात त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि पक्षाची ताकत तिपटीने वाढवली. त्यांचे स्वप्न अर्धवट राहिले असले तरी, आपण सर्वांनी मिळून ते पूर्णत्वास नेऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button