तपोवनेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा सोहळा उत्साहात
महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभ

* भक्ती आणि उत्साहाने दुमदुमला परिसर
अमरावती /20 फेब्रुवारी : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर श्री तपोवनेश्वर संस्थानच्या वतीने आयोजित धार्मिक अनुष्ठान आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावून दर्शनाचा लाभ घेतला. पहाटेपासूनच मंदिरामध्ये शिवभक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली असून, हर हर महादेवाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. भक्तिभावाने ओतप्रोत भरलेल्या या सोहळ्यात संस्थानच्या वतीने राबविण्यात आलेले शिस्तबद्ध नियोजन आणि सेवाभावी वृत्तीमुळे हा उत्सव खर्या अर्थाने दिमाखदार ठरला.
श्री तपोवनेश्वर संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या महाप्रसादाचे आयोजन सोमवारी दुपारी 1 ते 4 या वेळेत करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष अनिल भोजराज साहू, बाथरी तेली समाज अध्यक्ष रामचंद्र गुप्ता, रवी पंजाबी, प्रवीण सावळे, नगरसेवक दीपक सम्राट, अभिषेक पंजाबी, सुनील साहू, हरीश साहू, निलेश कुबडे, सचिन कानपूरकर, राजेश आचलीया, रणजित देशमुख, राहुल साहू, गणेश गुप्ता, ऋषी गुप्ता, गौरव दहेले, निकेश खुरखुरीया, कृष्णा साहू, हरीओम साहू, जय सावळे, विक्की खत्री, चिराग लुंग, आशिष धर्माळे, दिलीप ठाकरे, जय नावानी, रमेश कामरानी, हितेश पुरसवाणी, श्रीकांत गुप्ता, साहिल पंजाबी, विनय सिगरे, सागर गुप्ता, दिप रेंडी, मंगेश जतारिया, आशिष चोपडे, अतुल बकाले, रत्नेश जतारिया, कृष्णा थापरे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासूनच शिवभक्तांनी शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी गर्दी केली होती. शास्त्रोक्त पद्धतीने आणि विधिवत मंत्रोच्चारात अभिषेक संपन्न झाला. विशेष म्हणजे केवळ महाशिवरात्रीच नव्हे, तर संपूर्ण श्रावण महिन्यातही या ठिकाणी भक्तांचा असाच ओघ असतो. श्रावण महिन्यात दररोज पहाटे 4 वाजेपासून भाविक दर्शनासाठी येतात आणि शिवलिंगाची दररोज नवनवीन आकर्षक सजावट केली जाते.




