काँग्रेसचे खासदार लोकसभाध्यक्षांच्या दालनात घुसले
शिवीगाळ केल्याचा आरोप

नवी दिल्ली/12 फेब्रुवारी -देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून लोकसभेत मागच्या काही दिवसांपासून जोरदार गदारोळ सुरू आहे. अशातच आज केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसच्या खासदारांवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसचे 20 ते 25 खासदार लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांना शिवीगाळ केली. तसेच या खासदारांनी पंत प्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली, असे रिजिजू यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे. लोकसभेत काही दिवसआधीच किरेन रिजीजू यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तराचे भाषण होणार होते. पण, काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांच्या आसनाजवळ गेल्याने गोंधळ झाला होता.




