‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ व ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ लागू

अमरावती महानगरपालिकेच्या 13 शहरी आरोग्य केंद्रांमध्ये

नागरिकांना शहरातच मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार

अमरावती /11 फेब्रुवारी : महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित महत्त्वपूर्ण सभेमध्ये अमरावतीकरांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला. महानगरपालिकेद्वारे संचालित सर्व 13 शहरी आरोग्य केंद्रांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (चगझग-ध) व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (झचग-ध) अंतर्गत अंगीकृत करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आता महागडे उपचार मिळवण्यासाठी दूरच्या रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही, तर शहरी आरोग्य केंद्रांमधूनच योजनांचा थेट लाभ घेता येणार आहे.
या दोन्ही योजनांच्या माध्यमातून एकूण 2399 आजारांवर पूर्णपणे मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. या आरोग्य विमा योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष एकत्रित 5 लाख रुपयांपर्यंतचा उपचार खर्च शासनाकडून केला जातो. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे को-ब्रँडेड ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गोल्डन कार्ड’ असणे बंधनकारक आहे. हे कार्ड नसल्यास योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. त्यामुळे ज्या नागरिकांकडे अद्याप गोल्डन कार्ड उपलब्ध नाही, त्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या शासकीय दवाखान्यात संपर्क साधून कार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.गोल्डन कार्ड तयार करताना ए-घधउ प्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांचे राशन कार्ड अद्ययावत व ए-घधउ झालेले असणे गरजेचे आहे. तसेच आधार कार्ड अपडेट असणे आणि आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे. मोबाईलवर येणार्‍या ओटीपीद्वारे ए-घधउ प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनच दवाखान्यात जावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. सभेमध्ये 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वयवंदना योजना’ अंतर्गत स्वतंत्र लाभाची माहितीही देण्यात आली.

संबंधित बातम्या

Back to top button