सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हिंदू

नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल

मुंबई/10 फेब्रुवारी राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वरळी डोम येथे झालेल्या कार्यक्रमात अभि नेता सलमान खानसह अनेक नामवंत व्यक्ती उप स्थित होत्या. याच कार्यक्रमाचा संदर्भ देत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतील निकालानंतर त्यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला असून त्यांच्या वक्तव्यांची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. संघाच्या कार्यक्रमाला सलमान खान उपस्थित राहिला, याकडे लक्ष वेधत नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सलमान खान अधिक हिंदू विचारांचा वाटतो. राहुल गांधींसमोर उद्धव ठाकरे आपल्या वडिलांना ‘हिंदूहृदयसम्राट’ असेही म्हणू शकत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणशैलीवरही टीका करत, रटाळ प्रवचनांमध्ये त्यांनी जणू पीएचडीच केली आहे, असे उपरोधिक विधान केले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button