सुनेत्रा पवार पुणे अन् बीडच्या पालकमंत्री

शासन निर्णय जारी

मुंबई/3 फेब्रुवारी – : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या पदांवर अखेर राज्य सरकारने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईवरून बारामतीकडे विमानाने प्रवास करत असताना एका भीषण अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यांच्या निधननंतर राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र, प्रशासकीय आणि राजकीय स्थैर्य राखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घेत सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात स्थान दिले. सुनेत्रा पवार यांच्यावर आता मोठी जाबबादीर आहे. पुणे आणि बीड हे दोन्ही जिल्हे महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी एक आहेत. त्यामुळे या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी कुणाला मिळेल? याकडे सर्वांचं लक्ष होतं.

संबंधित बातम्या

Back to top button