आमच्याकडे विकासाचे मोठे व्हिजन आहे

यवतमाळ -मी कोणाला नावं ठेवत नाही, की कोणावर आरोप पण करत नाही. कारण आमच्या कडे एक विका साचे व्हिजन आहे. एखाद्या शहराला कशा पद्धतीने परिवर्तन करता येईल, यांची ब्ल्यू प्रिंट आमच्याकडे आहे. शहराच्या विकासामध्ये काय काम केलं पाहिजे याची दृष्टी आमच्याकडे आहे. म्हणून हे व्हिजन तुमच्यासमोर मांडण्यासाठी आणि या नगर पालिकेत सर्व भाजपाच्या नगर परिषद अध्यक्षापदांच्या उमेदवारांसाठी मत मागण्यास आलो आहे. आपल्या नगर परिषदांमध्ये भाजपाच्या हातात सत्ता द्या. मी तुम्हाला विकासाची खात्री देतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अॅेड. प्रियदर्शनी उईके यांच्या प्रचार सभेत केले.




