अमृतसरमध्ये दोन पाकिस्तानी हेरांना अटक
आयएसआयला, लष्कर कनेक्शन

-वॉट्सअपवरुन पाठविली माहिती
अमृतसर / 22 जून: पाकिस्तानकडून भारतामधील गोपनीय माहिती मिळविण्यासाठी अनेक हेरांची नेमणूक होत असते. अशा हेरांना पकडण्यात पंजाब पोलिसांना मोठं यश आलं आहे. पंजाब पोलिसांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था पाकिस्तानी गुप्तचर संस्था करणार्या दोघांना अटक केली आहे. अमृतसर ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, गुरप्रीत सिंग उर्फ गोपी फौजी आणि साहिल मसीह उर्फ शाली अशी अटकेतील गुप्तहेरांची नावे आहेत. गुप्तचर माहितीच्या आधारे, अमृतसर ग्रामीण पोलिसांनी आयएसआयशी संबंधित हेरगिरी कारवायांमध्ये सहभागी असणार्या या आरोपींना अटक केली आहे.
पंजाब पोलिसांचे डीजीपी गौरव यादव म्हणाले, गुरप्रीत सिंग हा पाकिस्तानच्या आयएसआयच्या एजंट्सशी थेट संपर्कात होता, असे प्राथमिक तपासात समोर आलं आहे. गुप्तहेर पेन ड्राइव्हद्वारे गुप्त आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानमध्ये शेअर करत होता. या प्रकरणातील मुख्य आयएसआय हँडलर हा राणा जावेद असल्याची माहिती समोर आली आहे. डीजीपी यादव म्हणाले, दोन्ही आरोपी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे सतत आयएसआयच्या संपर्कात होते. पोलिसांनी पाकिस्तानमध्ये संपर्कासाठी वापरलेले आरोपींचे दोन्ही मोबाईल फोनही जप्त केले आहेत. सध्या पोलीस दोघांचीही सखोल चौकशी करत आहेत. त्यांच्या हेरगिरीच्या नेटवर्कबद्दल पोलीस माहिती घेत आहेत.
पोलिसांनी त्यांच्या फोनची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानला नेमकी कोणती संवेदनशील माहिती पाठविली? फोनमधून कोणता डाटा नष्ट केला? याची माहिती मिळविण्यासाठी फोन हा सायबर चौकशीसाठी पाठविला आहे. सायबर पोलिसांच्या अहवालानंतर पाकिस्तानी हेरांची अनेक गुपिते उघड होणार असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित गुप्तहेर आणि दहशतवादी नेटवर्कमागील इतर साथीदारांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून तपास आहे. हेरगिरी आणि दहशतवादी नेटवर्क पूर्णपणे उद्धवस्त करण्यासाठी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. देशाच्या सार्वभौमत्वाचं आणि अखंडतेचं रक्षण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत, असे पंजाब पोलिसांनी म्हटलं आहे. देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल. पंजाबमध्ये कोणत्याही प्रकारच्या देशविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा पंजाब पोलीस महासंचालकांनी इशारा दिला आहे.




