ते सभागृहात एकही प्रश्न न विचारता पर्यटन करून गेले

नागपूर : विधीमंडळाच्या दोन्ही सभा गृहाचे आज सूप वाजले. एकूण सात दिवस चाललेल्या या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवस हजेरी लावली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्याची निवड होण्यासाठी अध्यक्षांची भेट देखील घेतली. मात्र उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे विधान परिषद सभागृहात एकही मुद्दा मांडला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आज (14 डिसेंबर) विधान परिषद सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, संपूर्ण अधिवेशनात विरोधकांनी विरोधी पक्षनेते पदाशिवाय दुसरी कोणतीही चर्चा केली नाही, हे दुर्देवं आहे.




