विदर्भातील जनतेला मिळाल्या वाटाण्याच्या अक्षता
हिवाळी अधिवेशन वांझोटे; विरोधकांचा हल्लाबोल

संयुक्त पत्रकार परिषदेत सरकारवर टीकास्त्र
नागपूर /14 डिसेंबर : नागपूर इथे सात दिवसाचे अधिवेशन पार पडले पण या अधिवेशनातून ना शेतकर्यांना काही मिळाले ना विदर्भातील जनतेला काही मिळाले त्यामुळे हे अधिवेशन वांझोटे ठरले अशी टीका विरोधी पक्षाने केली. अधिवेशन संपल्यावर विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेत विरोधकांनी सरकारवर निशाना साधला. महाराष्ट्रातील जनतेला अधिवेशनातून काहीतरी मिळावे म्हणून आम्ही संपूर्ण अधिवेशनात सरकारला मदत केली, मात्र सरकारने कोणताही चांगला निर्णय घेतला नाही. अस मत विरोधकांनी या पत्रकार परिषदेत मांडले. या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव म्हणाले, निवडणुकीत सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करण्यासाठी अधिवेशन झाले. सरकारकडून ज्या काही घोषणा झाल्या त्या मुंबई,ठाणे,नवी मुंबई यासाठी झाल्या, आगामी काळातील महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकारने निर्णय घेतले आहेत. विशेषत: मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या गेल्या, व त्यानुसार निर्णय घेण्यात आले. असं ते म्हणाले. पण विदर्भासाठी एकही घोषणा करण्यात आली नाही.त्यामुळे विदर्भातील जनतेची फसवणूक करणारे हे अधिवेशन होते अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे अधिवेशन झाले.सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले यांबाबत प्रश्न विचारूनही सरकारने कारवाई केली नाही अशी टीका सचिन अहिर यांनी केली. विदर्भातील धान,सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी या अधिवेशनाकडे डोळे लावून बसला होता. धानाला आणि सोयाबीनला बोनस मिळावा दर्भातील जनतेला मिळाल्या वाटाण्याच्या…
म्हणून आम्ही मागणी केली पण सरकारने कारवाई केली नाही.राज्यातील तरुणांना. ड्रगचा विळखा आहे पण त्यावर ही कारवाईची ठोस भूमिका सरकारची नाही अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील म्हणाले या अधिवेशनात घोषणांचा नुसता पाऊस पडला. कापूस खरेदीचे केंद्र वाढवा ही मागणी केली पण त्याचा ही निर्णय झाला नाही. पैसे नाही खिशात पण घोषणा मात्र अपार अशी अवस्था महायुती सरकारची आहे. या सरकारने इतक्या घोषणा केल्या की त्यासाठी बजेट कमी पडेल अशी अवस्था आहे, अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली.
सात दिवसात जनतेच्या पदरी निराशाच-मुख्यमंत्र्यांनी राज्यात गुंतवणूक येते, र्चेी झाले याबाबत सभागृहाला माहिती दिली पण ज्यांच्याबरोबर करार झाले त्या कंपन्या राज्यात येत नाही,प्रत्यक्षात गुंतवणूकच झालेली नाही त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली.विरोधी पक्षाने राज्यातील कायदा सुव्यवस्था बाबत प्रश्न उपस्थित केले त्यावर ठोस उत्तर मिळाले नाही त्यामुळे सात दिवसात जनतेच्या पदरी निराशाच आली अशी टीका जयंत पाटील यांनी केली.




