देशाला आज निर्भीड पत्रकारांची गरज

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा आपल्या भाष णात प्रसार माध्यमां विषयी बेधडक वक्तव्य केले आहे. देशातील प्रसार माध्यमांवर विविध प्रकारची टीका होत असतानाच गडकरींनी पुन्हा एकदा माध्यमांना आरसा दाखवला आहे. देशासमोर विचारभिन्नता ही समस्या नाही. पत्रकारांमध्ये निर्माण होत असलेली विचारशून्यता लोकशाहीसाठी घातक आहे. आज देशाला निर्भिड आणि बेधडक पत्रकारांची गरज आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नागपूरमध्ये ‘एस. एन. विनोद – 85 वर्षांची अनंत यात्रा’ या स्मारिकेचे प्रकाशन आणि सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. एस. एन. यांच्या बेधडक पत्रकारितेचे कौतूक करताना गडकरी म्हणाले, आणीबाणीच्या काळात विनोदजी यांनी आपल्या संपादकीय लेखांमधून सरकारविरुद्ध बिनधास्त मतप्रदर्शन केले.

संबंधित बातम्या

Back to top button