सलील देशमुख यांचा राष्ट्रवादीला रामराम

नागपूर : राज्यात सध्या स्थानिक स्व राज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. मात्र नगर परिषद
आणि
नगरपंचयत निवडणुकी आधीच शरद पवार यांना नागपूरमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांनी पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. सलील देशमुख आपला राजीनामा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना पाठवला आहे. त्यांनी पत्रात म्हटले की, गेल्या 20-22 वर्षांपासून राष्ट्रवादी शरद पवारांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी सक्रिय आहे. नागपूर जिल्हा, शहर आणि विदर्भ याठिकाणी प्रामुख्याने युवकांच्या बांधनीसाठी आपण केलेल्या प्रयत्नामध्ये कधी यश, तर कधी अपयश आले. मागील काळात मी नागपूर जिल्हा परिषद सदस्य असताना विकासावर भर देत अनेक मोठी विकास कामे आणि प्रकल्प सातत्यपूर्ण पाठपुरावा करून आपल्या परिसरासाठी आणले.




