नागपूरच्या सह दुय्यम निबंधकाचे अखेर निलंबन

नागपूर : तीन दिवसांपूर्वी सामेवारी राज्याचे महालुमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या खामला यथेथे असलेल्या दयुयम निबंध कार्यालयात अचानक छापा टाकला. यावेळी बावनकुळे यांनी त्यांच्या हातात मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर ही कारवाई केली. छापेमारी दरम्यान कार्यालयाच्या झाडाझडतीमध्ये एका अधिकार्याच्या ड्रॉवरमध्ये पैसे सापडले, ज्यामुळे आणखीनच खळबळ उडाली. अशा प्रकारे बावनकुळे यांच्या झाडाझडतीत भ्रष्टाचार उघडकीस आला. या प्रकरणी सह-दयुयम निबंधक अ. त. उ. कपाळे यांना निलंबित करण्यात आले आहे.




