नद्यांमध्ये पोहणे जीवावर बेतले, चौघे वाहून गेले

एकाचा मृतदेह आढळला, तिघे बेपत्ता

बुलढाणा /28 सप्टेंबर : कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश्य पावसाने थैमान घातले आहे. या तांडवामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून नद्या दुधडी भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम आणि 41 लघु प्रकल्प तुंडूंब भरल्याने नदी पात्रात मोठा विसर्ग सुरू आहे, ज्यामुळे नद्यांतील पाण्याची पातळी धोक्याची झाली आहे. या परिस्थितीत पोर्श भूमीवरील गावाजवळून वाहणार्‍या जीवनदायी नद्या धोकादायक ठरत आहेत. याचा भीषण प्रत्यय नांदुरा आणि मलकापूर तालुक्यांमध्ये रविवारी संध्याकाळी दिसून आला. या तालुक्यांतील दोन स्वतंत्र घटनांमध्ये चार जण दुधडी भरून वाहणार्‍या नदीत बुडाले, यापैकी एकाचा मृत्यू झाला असून मृतदेह सापडला, तर उर्वरित तिघांचा शोध स्थानिक बचाव पथक, पोलीस आणि गावकऱ्यांनी युद्धपातळीवर घेतला; संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. घटनांचा विस्तृत तपशील मिळालेला नसला तरी संबंधित तहसील कार्यालये आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने या घटनांना दुजोरा दिला आहे. नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ज्ञानगंगा नदीत दुपारी करण भुमरे (18) आणि वैभव फुके (19) पोहण्यासाठी गेले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आणि प्रवाह जास्त असल्याने ते वाहून गेले. स्थानिक महसूल प्रशासन, पोलीस आणि ग्रामस्थ त्वरित घटनास्थळी दाखल झाले.

संबंधित बातम्या

Back to top button