राज्यातील महापालिका निवडणुका जानेवारीत?

नागपूर: नगरपरिषद, नगर पंचायत निवड णुकीचा बिगुल वाजल्या नंतर आता सर्वांना आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीची प्रतीक्षा लागली आहे. महापालिका निवडणूक जानेवारीत होऊ शकते, असे संकेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नागपुरातील त्यांच्या परंपरागत दक्षिण पश्चिम मतदार संघात आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना या संदर्भात कामाला लागण्याचे संकेत दिले. गेली साडेतीन वर्षे महापालिका निवडणुका न झाल्याने आजी-माजी नगरसेवक अस्वस्थ आहेत. प्रशासक राज सुरू असल्याने कामे खोळंबल्याने सर्वसामान्य जनता देखील त्रस्त आहे. निवडणूक न झाल्याने जनतेशी संपर्क कमी झाला.मात्र, आता जानेवारी महिन्यात निवडणुका होणार असल्याने सज्ज व्हा.

संबंधित बातम्या

Back to top button