सीबीएसईच्या अभ्यास क्रमात फक्त 68 शब्दांत शिवरायांचा इतिहास

नागपूर– काँग्रेसचे नेते आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान सभेत सीबीएसई बोर्डाच्या अभ्यास क्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखा वरून तीव्र संताप व्यक्त केला. तांबे म्हणाले की, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यास क्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील माहिती फक्त 68 शब्दांत पुरवण्यात आली आहे, हे संपूर्ण देशातील नागरिकांसाठी खेदाची बाब आहे. सत्यजीत तांबे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांचा इतिहास देशपातळीवर पोहोचू शकत नसेल, तर हे दुर्दैव आहे. शिवरायांव्यतिरिक्त इतर राज्यांबद्दल भरभरून माहिती दिली जाते. या विषयावर चर्चा करण्यासाठी वारंवार सभागृहात प्रश्न मांडावे लागतात. मला वाटते, हे शालेय शिक्षण विभागाचे अपयश आहे. तांबे यांनी सरकारला थेट आवाहन केले की, जर सीबीएसई बोर्ड फक्त 68 शब्दांत छत्रपतींचा इतिहास सांगत असतील.

संबंधित बातम्या

Back to top button