समलिंगी बँक अधिकार्‍यावर चौघांकडून अत्याचार

अकोला हादरलं! व्हिडिओ बनवून 80 हजार उकळले

-‘गे-डेटिंग’ अँप’द्वारे पुरुषांची फसवणूक
-आरोपी पीडितांना द्यायचे इंजेक्शन
अकोला / 29 जून: अकोल्यात ‘गे-डेटिंग’ अँपद्वारे पुरुषांची फसवणूक करणार्‍या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. आजकाल ‘गे-डेटिंग’ अ‍ॅप्स समलिंगी पुरुषांसाठी फसवणुकीचा मोठा अड्डा बनलाय. या अ‍ॅपच्या माध्यमातून काही गुन्हेगार ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकवत आहे. अकोल्यात देखील ‘गे-डेटिंग’ अ‍ॅपच्या माध्यमातून बँकेच्या एका अधिकार्‍यासोबत या अ‍ॅपवर ओळख करीत, त्यानंतर या अधिकार्‍याला भेटण्यासाठी अज्ञात स्थळी बोलवलं. त्यानंतर तिथे चौघांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केलाय. इतकंच नव्हे तर या संपूर्ण घटनेचं मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केले. पुढं बँकेच्या अधिकार्‍याला ब्लॅकमेलिंग करीत तब्बल 80 हजार रुपयांनी आर्थिक फसवणूक केली. चौघांपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. मनीष नाईक आणि मयूर बागडे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
अकोल्यातील खदान पोलीस स्टेशन हद्दीत एका पीडित बँकेच्या अधिकार्‍याने समलिंगी अर्थातच ‘गे-डेटिंग’ अ‍ॅपवरुन फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. अधिकार्‍याने तक्रारीत म्हटलं आहे की, समलिंगी डेटिंग अ‍ॅपवरुन एका व्यक्तीने संपर्क साधला. पुढं मैत्री झाली अन् बोलणं सुरु झालं. 14 जून रोजी भेटायचं ठरलं. त्यानंतर अकोल्यातीलच हिंगणा फाट्याजवळ बँकेचा अधिकारी त्या व्यक्तीला भेटायला गेला. तिथे मनीष नाईक हा भेटायला पोचला. त्यानंतर तिथून दोघेजण कारने शहरातल्या नदीच्या काठी गेले.
या ठिकाणी त्याने बँकेच्या अधिकार्‍यासोबत समलिंगी संबंध प्रस्थापित केलेत. त्यानंतर त्याने त्याच्या 3 साथीदाराना देखील बोलावून घेतलं. त्यांनी देखील या अधिकार्‍यावर अत्याचार केलाय. या दरम्यान, पीडिताचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आणि त्यावरुन ब्लॅकमेल करत माझ्याकडून पहिल्या टप्प्यात 30 हजार रुपयांपेक्षा अधिक रुपये उकळले. त्यानंतर काही दिवसातच पुन्हा पैसे घेतले. असे एकत्रित आतापर्यंत 79 हजार 300 रुपये उकळले आहे, अशी माहिती पीडित व्यक्तीने पोलिसांना दिली.
खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीला पकडण्यासाठी विशेष सापळा रचण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांकडं केवळ आरोपीचा मोबाईल क्रमांक होता. मात्र ठोस पुरावे हाती नव्हते. म्हणून पीडित आरोपीच्या शोधांसाठी पीडित व्यक्ती पुन्हा तरुणांसोबत भेटण्यासाठी गेला. त्यावेळी मनीष नाईक हा तिथे आला. लागलीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. अशा प्रकारे संपूर्ण घटनेचा पर्दाफाश झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेत दोन आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष नाईक याच्याकडे इंजेक्शन होते. हा भेटण्यासाठी आलेल्या पिडीतांना अर्थातच गे-पुरुषांना इंजेक्शन द्यायचा, जेणेकरून त्यांच्यामध्ये उत्तेजना निर्माण व्हायची. त्यानंतर हे पीडितांवर अत्याचार करायचे. दरम्यान आतापर्यंत या चौघांनी गे-डेटिंग पच्या माध्यमातून कित्येकांची फसवणूक केली, याचा तपास देखील पोलीस करणार आहेत. दरम्यान, संपूर्ण घटनेनंतर फसवणूक झालेल्या पीडितांनी समोर येण्याच आवाहन पोलिसांनी केले.

संबंधित बातम्या

Back to top button