संघावर बंदी घाला म्हणणारे राष्ट्रद्रोही

बावनकुळे यांची खोचक टीका

नागपूर/23 ऑक्टोबर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. बावनकुळे म्हणाले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला म्हणणारे लोक मूर्ख आहेत.” भंडार्‍यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे व्यक्तींना राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिर्माणाकडे घेऊन जाणारी देशातील प्रमुख संस्था आहे. संघाने दिलेला विचार संपूर्ण भारतात नवी प्रेरणा निर्माण करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाच्या विकासासाठी राष्ट्रनिर्माणाची संकल्पना दिली आहे. त्यामुळे जे लोक संघावर बंदी घालण्याचा विचार करतात, त्यांना केवळ राष्ट्रहिताची किंवा राष्ट्रभावनेची कल्पना नाही; हे लोक राष्ट्रद्रोही आहेत, असा खोचक आरोप बावनकुळे यांनी केला.

बावनकुळे यांनी पुढे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेल्या 32 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचा मुद्दाही मांडला. त्यांनी म्हटले की, शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाले असून, ज्या प्रमाणात सरकारने पॅकेज दिले आहे, त्यातून शेतकऱ्यांना आवश्यक आधार मिळत नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते, जसे की नाना पटोले, विजय वडेट्टीवार इत्यादी, खाजगीमध्ये हार मान्य करतात, पण आता जनतेसमोर स्वतःला टिकवण्यासाठी आणि कार्यकर्ते टिकवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. बावनकुळे यांनी सांगितले की, जनता महायुतीच्या मागे उभी आहे आणि काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडे आता कुणी राहायला तयार नाही.

संबंधित बातम्या

Back to top button