निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार

नागपूर : राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या आज 3 डिसेंबर रोजीच्या निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे, आता 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये, विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोपही केले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता माजी मंत्री तथा आमदार नाना पटोले यांनीही निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणण्याची मागणी केली.

संबंधित बातम्या

Back to top button