मोदींच्या वाढदिवशी युवक काँग्रेसचा आंदोलक स्वर
बेरोजगार दिना’त संताप व्यक्त

-पंचवटी चौकात घोषणाबाजी
-बेरोजगारीच्या प्रश्नी कार्यकर्त्यांची निदर्शने
अमरावती / 17 सप्टेंबर : अमरावती शहरात युवक काँग्रेसकडून आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘बेरोजगार दिन’ पाळत प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. ‘नोकरी चोर गादी सोड’, ‘डिग्री चोर गादी सोड’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पंचवटी चौकात झालेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
पंचवटी चौकात अमरावती युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. बेरोजगारीच्या प्रचंड प्रश्नावर केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाला ‘बेरोजगार दिन’ म्हणून साजरा करत तीव्र निषेध प्रकट केला. आंदोलनादरम्यान युवकांनी जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला. केंद्र सरकारच्या रोजगारविषयक अपयशामुळे देशातील तरुण वर्ग निराशेत असल्याचे सांगून, केवळ घोषणाबाजीच्या आधारे रोजगार निर्मिती होत नसल्याचा हल्लाबोल करण्यात आला. राष्ट्रीय नेतृत्वाच्या सूचनेनुसार अमरावती युवक काँग्रेसने हे आंदोलन केले. या आंदोलनामुळे पंचवटी चौक स्थानिक पातळीवर निषेधाचे केंद्र ठरले. या निदर्शनात सहभागी सर्व युवकांनी बेरोजगारीच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सरकारसमोर केली.
यावेळी अमरावती विधासभा युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख, शहर जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे, अक्षय साबळे, निखिल बिजवे, शिवानी पारथी, एफ. अफरोज खान, एनएसयूआयचे शहराध्यक्ष संकेत साहू आदींसह सौरभ तायडे, चैतन्य गायकवाड, धनंजय बोबडे, सुजल इंगळे, साहिल वानरे, निशांत पवार, सम्यक वाकोडे, अभिषेक भोसले, कृष्णा बिसने, रोशन पवार, प्रथमेश गावंडे, मयूर निंभोरकर, हर्षल यावलीकर, अनिकेत क्षीरसागर, सुमित मानकर, आदित्य बिसने, अनय वाटाणे, सूरज चव्हाण, क्रिश कुचे, यश काठलेकर, ओम डोलस, प्रीतम कुकडे, आदित्य आगरकर, बन्नी सिंग, चेतन पवार, धनराज बागडे, दीपक शेंडे, प्रफुल्ल तंतरपाळे, गोविंद ठाकरे, घनश्याम वखरकर, मोहित भेंडे, आनंद बरडे यांच्यासह मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते सहभागी झाले.




