युवा शेतकर्‍याची गळाफास घेवुन आत्महत्या

तालुक्यातील आलोडा येथील

वरुड । 4 ऑक्टोबर – तालुक्यातील आलोडा येथील अठ्ठाविस वर्षीय युवा शेतकर्‍याने सततची नपिकी व कर्जबाजारीपणामुळे राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी बेनोडा (शहीद) पोलीस तपास करीत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश मनोहर गावंडे (28) रा. आलोडा, ता. वरुड असे गळफास घेत लेल्या शेतकर्‍याचे नाव असून तो आईसोबत राहत होता. मंगेश याचे वडील अपंग आहे त्यामुळे पुर्ण परिवाराचा भार त्यांचेवरच होता. काल (दि.3) ला आईसोबत जेवण करुन तो झोपला. मात्र आज सकाळी त्याच्या आईला तो घरातील फाट्याला दोरखंडाच्या सहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर बेनोडा (शहीद) पोलिसांना घटनेची माहिती दिल्यावरुन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविला. मंगेश याचेकडे 1 एकर कोरडवाहु शेती असून मागील दोन वर्षांपासून त्याला नपिकी झाली. कुटुंबाचा चारितार्थ चाळिवण्यासाठी त्याने उधारी उसणवारिने कर्ज घेतले होते तसेच त्याचेकडे बँकेचे कर्ज सुद्धा होते. कर्ज परत फेडीची चिंता त्याला सातावीत असल्याने तो गेल्या काही दिवसापासून विमनस्क अवस्थेत होता, असे सांगण्यात येते.

संबंधित बातम्या

Back to top button