तुम्ही फक्त कमळाला मते द्या, विकासाचे कार्य आमचेवर सोडा

राज्याचे महसुलमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

वरुडमध्ये भाजपा उमेदवारांची जाहीर सभा

वरुड । 30 नोव्हेंबर  – ही निवडणुक केवळ ईश्वर सलामे यांना निवडून देण्यासाठी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या विविध योजना नगरपरिषदांसाठी आणलेल्या आहेत, त्या सगळ्या योजना वरुड नगरपरिषदेमध्ये आणुन त्यामार्फत वरुडडचा विकास करणे हा खरं म्हणजे निवडणुक लढण्यामागचा आमचा मुख्य उद्देश आहे, आतापर्यंतच्या इतिहासात एवढा विकास झाला नाही, तेवढा विकास आपण करण्याचा प्रयत्न केला.
भारतीय जनता पार्टीने वारंवार विकासालाच महत्व दिलेले आहे, अशा स्थितीमध्ये वरुड, शेंदुरजनाघाट आणि मोर्शी या तिन्ही शहरांचा विकास करण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. तुम्ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, त्याचे साक्षीदार म्हणुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः राहील आणि या तिन्ही शहरांचा विकास केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आतापर्यंतच्या इतिहासात गेल्या 10 वर्षांमध्ये जेवढा विकास झाला तेवढा विकास आजपर्यंत तुम्ही बघितला नसेल परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या तिन्ही नगर परिषदेचा जो महत्त्वपूर्ण विकास करावयाचा आहे, तो केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, येत्या 5 वर्षांमध्ये एकही काम शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही देत वरुड मोर्शी आणि शेंदुजनाघाटचा विकास करीत कायम कायापालट केल्याशिवाय आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर यांना स्वस्थ बसु देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे महसुलमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते न.प.मराठी शाळेच्या प्रांगणात भारतीय जनता पार्टी उमेदवारांसाठी आयोजीत प्रचारसभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यसभा खा.डॉ.अनिल बोंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, सरचिटणीस डॉ सुमित पवार, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत, शहराध्यक्ष राहुल आगरकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ईश्वर सलामे, प्रसिद्ध स्त्री व प्रसुती तज्ञ डॉ.मनोहर आंडे, माजी जि.प.सदस्य गोपाल मालपे, श्रीधर सोलव, माजी जि.प.सभापती अर्चना मुरुमकर, निळकंठ मुरुमकर, मोरेश्वर वानखडे, अमित कुबडे, माजी शहराध्यक्ष योगेश्वर खासबागे, अनिता तिखिले, माजी पं.स.सभापती विक्रम ठाकरे, धनंजय उमप, भाग्येश देशमुख, प्रभाकर काळे, राजू हजारे, रुपाली सोंडे, वरुड नगर परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर यांचेसह अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी बोलतांना उमेश उर्फ चंदू यावलकर यांनी उपस्थित मतदारांना भावनिक साद देत भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला मोठया संख्येने शहरवासियांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे संचालनप्रा.कमलनारायण उईके यांनी केले.

संबंधित बातम्या

Back to top button