भरवस्तीत महिलेकडून हातभट्टीवर दारु गाळप

गुन्हे शाखेचा छापा, वडाळी परिसरात कारवाई

अमरावती / 6 जुलै: वडाळी परिसरातील परिहारपूरा या रहिवासी वस्तीत एका महिलेकडून घरातच हातभट्टीची दारु गाळण्याचा गोरखधंदा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने या अड्ड्यावर धाड मारुन कारवाई केली. यावेळी पोलिसांनी सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, वडाळी परिसरात परिहारपूरा हा लोकवस्तीचा भाग आहे. येथे एक 32 वर्षीय महिला हातभट्टीचा व्यवसाय करते आणि ती चुलीवर गावठी दारु गाळते, अशी गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी याठिकाणी छापा मारला. महिलेला चुलीवर गावठी दारु गाळताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी येथून गावठी दारु काढण्याचे साहित्य व 120 लिटर मोहाचा सडवा, 50 लिटर गावठी दारु असा मुद्देमाल जप्त केला. महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलिस निरिक्षक संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरिक्षक महेश इंगोले, उपनिरिक्षक संजय वानखडे, अंमलदार महेंद्र येवतीकर, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, आस्तिक देशमुख, मनोज ठोसर, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, सागर ठाकरे, योगेश पवार, विशाल वाकपांजर, संदीप खंडारे, चेतन शर्मा, राहुल दुधे यांच्या पथकाने केली.

संबंधित बातम्या

Back to top button