शाळा सुरु राहील का संप?

सरकारचा आदेश शाळा सुरु राहणार

* बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापणार

* शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईचा इशारा

अमरावती/4 डिसेंबर  :  शिक्षण संचालनालयाने आज 5 डिसेंबर 2025 रोजी होणारे शाळा बंद आंदोलन रोखले आहे. मुख्याध्यापक महामंडळाने पुकारलेल्या या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. यात एका दिवसाच्या वेतनाच्या कपातीचाही समावेश आहे. सर्व शाळांपर्यंत हा आदेश पोहोचवण्यात आला आहे.
मुख्याध्यापक महामंडळाने आपल्या मागण्यांसाठी हे राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. मात्र, विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी शाळा बंद ठेवू नयेत, असे स्पष्ट निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, ज्यात एका दिवसाच्या वेतनाच्या कपातीचाही समावेश आहे. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी संप पुकारला होता. या संदर्भात पुण्यात झालेल्या बैठकीत सर्व शाळा एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येणार आहेत. आता शिक्षण विभागाच्या तंबीनंतर शिक्षक संघटना कोणती भूमिका घेणार हे आज शुक्रवार रोजी स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या

Back to top button