दोन अतिक्रमण अधिकार्‍यांकडे जबाबदारी का?

गणेश मरोडकर यांचा प्रश्न

* हप्ते वसुलीचा आरोप

अमरावती /4 डिसेंबर – भगतसिंग हॉकर्स युनियनचे अध्यक्ष तथा पथ विक्रेता समितीचे सदस्य गणेश मरोडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यांनी असाही आक्षेप घेतला आहे की, त्यांनी अतिक्रमण विभागाचे दोन प्रमुखांकडे जबाबदारी कश्याप्रकारे सोपविली आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
पत्रकार परिषदेत पथ विक्रेता समितीचे सदस्य गणेश मरोडकर यांनी प्रसार माध्यमांना माहिती देतांना सांगितले की, योगेश कोल्हे यांच्याकडे मनपा अतिक्रमण विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्याचा आदेश जारी झालेला नाही. मरोडकर यांच्या माहितीनुसार 23 एप्रिल 2018 रोजी अतिक्रमण विभाग प्रमुख योगेश कोल्हे यांना कंत्राटदाराकडून 1,000 रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी रंगेहात ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे कोल्हे सारख्या बदनाम अधिकार्‍यास पदमुक्त करुन अतिक्रमण विभागाला या अवैध वसुलीची महानगरपालिकेत कुठेही नोंद नाही. तसेच अतिक्रमण धारकाकडून योगेश कोल्हे हा हप्ता वसुली करीत आहेत असा खळबळजनक आरोप केला आहे. शहरातील नगर वाचनालया समोरील सर्व गाड्यांनी अतिक्रमण केले आहे. या सर्वांकडून योगेश कोल्हे दर महिण्याला लाखो रुपये वसुल करीत आहे. वर्ष 2013 मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अद्यापही पालन करण्यात आले नाही, असा दावाही मरोडकर यांनी केला आहे. भ्रष्ट अधिकार्‍यास तातडीने निलंबित करुन अतिक्रमण विभाग भ्रष्टाचारमुक्त करण्यात यावा. अशी मागणी त्यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातुन केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button