वरुड नगरपरिषद निवडणूक 2025 स्थापनेपासन संत्रानगरीत 26 नगराध्यक्षांनी सांभाळला कारभार

वरुड । 16 नोव्हेंबर – संत्रानगरी वरुड नगरपरिषदेत सनब 1937 मध्ये म्युनिसिपल कम्युनिटी मंजुर झाली आणि प्रथम नगराध्यक्षपदी अप्रत्यक्ष स्वरुपात ब्रिटीश सरकारने नरहर गोविदं देशपांडे यांना नियुक्त करुन 13 सदस्यांची राजपत्रीत समिती तयार केली. पहिल्या नियोजीत नगराध्यक्षांचा कार्यकाळ 1 वर्षाचा होता. त्यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर जनतेतुन निवडणूक घेतल्या गेली. यामध्ये लोकतंत्र पध्दतीने जागोजी राघोजी आंडे हे नगराध्यक्ष म्हणून निवडूण आले. वरुड नगरपरिषदेच्या स्थापनेपासून आजपर्यंत 88 वर्षात एकूण 26 नगराध्यक्ष आणि 10 प्रशासकांनी वरुड नगरपरिषदेचा कार्यभार सांभाळला.
यामध्ये वरुड नगरपरिषदेच्या इतिहासात लक्ष्मणराव बेलसरे यांचा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ सर्वाधिक म्हणजे 17 वर्ष 9 महिन्यांचा राहला आहे. तर यावलकर परिवारातील तिन सदस्यांनी नगराध्यक्षपद भुषविले. यामुळे बेलसरे व यावलकर परिवाराचे या नगरपरिषदेवर वर्चस्व राहीले. 88 वर्षाच्या कार्यकाळात सर्वाधिक सत्ता काँग्रेसची राहली. त्यानंतर काँग्रेसचे विभाजन होवून राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय झाला आणि लक्ष्मणराव बेलसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणुक लढवुन नगराध्यक्षपदी आरुढ झाले. सन 2006 च्या निवडणूकीत मतदारांनी शिवसेनेला पसंती दिली. सन 2011 च्या निवडणूकीत शिवसेनेची सत्ता स्थापन झाली. आणि नगराध्यक्षपद हेमलता कुबडे यांना मिळाले. त्यानी अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर तत्कालीन जनसंग्राम पार्टीच्या उमेदवारीवरुन निवडूणन आलेले रविंद्र थोरात नगराध्यक्ष बनले. 2016 मध्ये नगराध्यक्ष पदाकरीता थेट जनतेतून निवड केली गेली आणि मिनी आमदार बनण्याकरीता अनेक इच्छुक महिला उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले. स्वातंत्र्या अगोदरची ही वरुड नगरपरिषद आहे. सन 2016 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले. नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर नरहर देशपांडे यांचा कार्यकाळ 24 ऑक्टोंबर 1938 पर्यंत होता. दुसरे नियोजित नगराध्यक्ष खंडेराव काळे यांचा कार्यकाळ ऑक्टोंबर 1938 ते 10 जुलै 1939 पर्यंत राहला. त्यानंतर झालेल्या निवडणूकीत जागोजी आंडे यांचा कार्यकाळ जुलै 1939 ते सप्टेंबर 1946, मारोतराव चौधरी नोव्हेंबर 1946 ते ऑक्टोंबर 1951, नोव्हेंबर 1952 ते जुन 1959 पर्यंत दोन वेळा नगराध्यक्ष पदावर आरुढ झाले. विश्रामजी श्रावणजी यावलकर 1959 ते 1962, भगवंतरावजी खेरडे 1962 ते 1965, विश्रामजी यालकर 1965 ते 1967, लक्ष्मणराव बेलसरे 1967 ते 1974, आत्माराम यावलकर नोव्हेंबर 1974 ते 1979, यानंतर मे 1979 ते 1980 पर्यंत प्रशासक एम.के.मिश्रा यांनी कामकाज पाहिले. त्यांनतर निवडणुकी द्वारा फॉरवर्ड ब्लॉकचे आत्माराम यावलकर 1980 ते फेब्रुवारी 1981 पर्यंत नगराध्यक्ष राहले. राजकीय अस्थिरते दरम्यान पुन्हा 4 वर्षापर्यंत प्रशासकाचे कार्यकाळ चालले. त्यांनतर निवडणुकी द्वारा शिवसेनेच्या उमेदवारीवर दिनेश खेरडे 1986 मध्ये नगराध्यक्षपदी आरुढ झाले. डिसेंबर 1986 पासून लक्ष्मणराव बेलसरे 17 नोव्हेंबर 1987 पर्यंत नगराध्यक्ष राहिले. सुहास चौधरी नोव्हेंबर 1987 ते 19 नोव्हेंबर 1990 पर्यंत नगराध्यक्ष राहीले. त्यांनतर 1994 पर्यंत लक्ष्मणराव बेलसरे नगराध्यक्ष राहीले. संजय यावलकर 1994 ते डिसेंबर 1996 पर्यंत नगराध्यक्ष होते. 2001 पर्यंत पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणुन रजनीताई शिंगरवाडे नंतर कांता गवई, उषा आंडे नगराध्यक्षपदी होत्या. त्यानंतर पुन्हा जनतेतून नगराध्यक्षाची निवड होवुन यामध्ये लक्ष्मणराव बेलसरे विजयी झाले नंतर शिवसेनेला जनादेश मिळाला आणि जया नेरकर अडीच वर्ष नगराध्यक्ष राहील्या. 17 जुन 2009 पासून राजु काळे नगराध्यक्ष होते. 2011 मध्ये हेमलता कुबडे आणि अडीच वर्षानंतर जनसंग्रामच्या उमेदवारीवर निवडून आलेले रविंद्र थोरात हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले नंतर 2016 पासुन भाजपाच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या स्वाती आंडे 2021 पर्यंत कायम होत्या. तेव्हापासुन नोव्हेंबर 2025 पर्यंत प्रशासक कार्यभार सांभाळत आहे. दिर्घकाळ सत्तेत बेलसरे व यावलकर वरुड नगर परिषदेच्या इतिहासात स्थापनेपासून 88 वर्षाच्या कार्यकाळात 26 नगराध्यक्ष आणि 10 प्रशासक राहीले. या दरम्यान लक्ष्मणराव बेलसेरे यांनी 17 वर्ष 9 महिने नगराध्यक्षपद भुषविले तर यावलकर परिवारातील विश्रामजी यावलकर 2 वेळा, आत्मारामजी यावलकर 2 वेळा, संजय यावलकर 1 वेळ नगराध्यक्ष राहीले. आजपर्यंतच्या इतिहासात 6 महिला नगराध्यक्षांनी पद भुषविल्यानंतर आता 2025 मध्ये कोण नगराध्यक्ष वरुड नगरपरिषदेत विराजमान होईल? हे 3 डिसेंबर 2025 ला कळेल. नगरपरिषदेत बेलसरे व यावलकर परिवाराने दिर्घकाळ राज्य केले असले तरी मात्र या निवडणुकीत मतदार राजा कोणाला कौल देतो, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button