श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय द्वारे मतदार जनजागृती तिरंगा महारॅली
राजमाता माँ जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंतीच्या निमित्त

अमरावती /12 जानेवारी : श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे 12 जानेवारी 2026 रोजी राजमाता माँ जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयामध्ये एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राणांगणात करण्यात आले उपरोक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे , प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. प्रल्हाद मेश्राम व त्यांची संपूर्ण टीम सोबतच स्थानिक महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापिका डॉ. पुष्पलता देशमुख उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात माता केवळ मयाळू नसून ती शक्ती असू शकते याचं सर्वात मोठे उदाहरण राजमाता माँ जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान युगपुरुष स्वामी विवेकानंद व शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे आरंभिक प्रास्ताविक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. प्रल्हाद मेश्राम यांनी केले त्यांनी आपल्या भाषणामध्ये अमरावती महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरात मतदार जनजागृतीसाठी व्यापक अभियान अमरावती महानगरपालिकेतील शिक्षण विभागाद्वारे राबविण्यात येत आहे. त्यामुळे मतदानाबाबतची जागरुकता जनमानसामध्ये अधिकाधिक वाढावी याकरता विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या घरच्यांना व आजूबाजूच्या मतदारांना मतदान करण्यासाठी जागृत करावे. असे याप्रसंगी डॉ.प्रल्हाद मेश्राम यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना आवाहन केले. माँ जिजाऊनी अत्यंत प्रतिकूल अशा कौटुंबिक, सामाजिक व राजकीय पर्यावरणात बहुजन समाजाच्या उद्धारासाठी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. खंबीर नेतृत्व, करारी बाणा व धाडसी वृत्ती या गुणवैशिष्ट्यांच्या आधारावर त्या हिंदवी स्वराज्याच्या प्रेरक शक्ती ठरल्या.




