विठ्ठल नामाच्या जयघोषात युवक कॅांग्रेसचे शहर स्वच्छता अभियान

आषाढी एकादशी निमित्त उपक्रम

-विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसराची स्वच्छता
-मनपाविरोधात ‘गांधीगारी’ पद्धतीने आंदोलन
अमरावती/6 जुलै: शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा, मनपाच्या दुर्लक्षामुळे वाढलेली अस्वच्छता व काही निवडक ठेकेदारांच्या मनमानी कारभाराविरुद्ध अमरावती शहर युवक कॅांग्रेसद्वारे ‘गांधीगारी’ पद्धतीने आवाज उठवत विशेष स्वच्छता अभियान राबविले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 19 जून पासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. पुढील टप्प्यात आज 6 जुलै, रविवार रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने या अभियानांतर्गत राजापेठ प्रभागातील हरिओम कॅालनीच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरातील साफसफाई करण्यात आली.
दरवर्षी या मंदिरात आषाढी एकादशी निमित्त परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने दर्शनाला येत असतात. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील आषाढीनिमित्त केले जात असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मंदिर सभोवतालच्या परिसरात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र युवक काँगे्रसच्या स्वच्छता वारी आंदोलनाच्या इशार्‍याने मनपाची यंत्रणा खडबडून जागी झाली. युवक कॅांग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या मेहनतीने मनपाच्या यंत्रणेच्या सहाय्याने परिसरातील कचरा उचलून स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या राबवली. परिसरातील नागरिकांनीही यावेळी युवक कॅांग्रेसच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला व या अभियानाचे स्वागत केले.
यावेळी माजी नगरसेवक मुन्ना राठोड, नितीन गौरखेडे, दिलीप कदम, राजेश फिस्के, प्रकाश पुसदकर, निलेश मसदकर, गजानन रेवाळकर, सागर बिजवे, सचिन काळे, श्री.काकर्डे, प्रफुल्ल ठाकरे, अमोल पुसदकर, संकेत पांडे व परिसरातील इतर नागरिक व दर्शनाला आलेले इतर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवक काँग्रेसच्या या शहर स्वच्छता अभियानात समीर जवंजाळ, वैभव देशमुख, योगेश बुंदेले, संकेत साहू, शुभम बांबल, मोहीत भेंडे, श्रेयस धर्माळे, शंतनु देशमुख, प्रियल मोहोड, अंकुश टोपले, शुभम हिवसे, ओम कुबडे, वेदांत केने, अभय देशमुख, साईप्रसाद जाधव, सुशांत कोते यांनी योगदान दिले.

संबंधित बातम्या

Back to top button