विजय वडेट्टीवार यांचे उध्दव ठाकरेंना साकडे

चंद्रपूर– महापालिकेमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करण्या साठी प्रयत्न करत असताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर दोन्ही नेत्यांमध्ये जवळ जवळ 30 मिनिट चर्चा झाली. शिवसेना ठाकरे गटाचे सहा नगरसेवक निवडून आलेले असताना या नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा, यासाठी उद्धव ठाकरे सोबत विजय वडेट्टीवार यांनी चर्चा केली असल्याची माहिती आहे. दरम्यान या भेटी बाबत स्वतः विजय वडेट्टीवार यांनी माहिती देत प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अर्धा तास चर्चा केली आणि चंद्रपूर महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता यावी.




