वाहन चोरटा गजाआड, दुचाकी जप्त

गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती / 4 जुलै: चपराशी पूरा परिसरातील शुक्रवार बाजार येथून दुचाकी चोरल्याच्या प्रकरणातील आरोपीला गुन्ह शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. मनीष माहुलकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बेलपूरा परिसरातून गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतले. मनीषच्या चौकशीतून दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
मनीष माहुलकर याने शुक्रवार बाजारातून काही दिवसांपूर्वी एमएच 27 / एम 1144 क्रमांकाची दुचाकी चोरली होती. याबाबत राहुल नगर विटभट्टी परिसरातील रहिवासी असलेले एसटी बसचालक दिलीप भरडे यांनी फ्रेजरपूरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान या चोरीत मनीष माहुलकरचा हात असल्याची माहिती समोर आल्यानंतर गुन्हे शाखेने त्याला अटक केली व त्याच्याकडून सदर दुचाकीही जप्त केली.
ही कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात आणि गुन्हे शाखेच्या निरिक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात हेकॉ मंगेश लोखंडे, मंगेश परिमल, शैलेन्द्र अर्डक, लखन खुशराज, रुपेश काळे, मयुर बोरेकर यांनी केली.

संबंधित बातम्या

Back to top button