केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शनिवारी जिल्हा दौर्‍यावर

अमरावती /9 ऑक्टोबर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शनिवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि गुरुकुंज मोझरी दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यानुसार, केंद्रीय मंत्री श्री. गडकरी हे दुपारी 12.50 वाजता श्री क्षेत्र माधान, ता. चांदूर बाजार येथे ‘सक्षम’ आणि श्री संत गुलाबराव महाराज संस्थानतर्फे आयोजित दिव्यांग व्यक्तींच्या सत्कार समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3.50 वाजता अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळातर्फे आयोजित गुरूकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर सायंकाळी 5.15 वाजता हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रस्थान करतील.

संबंधित बातम्या

Back to top button