भरधाव वाहनाच्या धडकेत दोघे गंभीर
गुरुकुंज मोझरी बायपास वळण मार्गावरील घटना

तिवसा /9 नोव्हेंबर : भरधाव चारचाकी वाहनाने विरुद्ध दिशेने येणार्या दुचाकीस जोरदार धडक दिली.यात दुचाकीचालक व अन्य एक महिला गंभीर जखमी झाली असुन ही घटना तिवसा ते मोझरी महामार्गावर पेट्रोलपंप नजीकच नवीन बायपासवर रविवार ता..9 दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. देविदास लेकुरवाडे, वय 58, वर्षे रा. (तळेगाव श्यामजीपंथ,) गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देवीदास लेकुरवाडे, एम. एच.32, 3387,क्रमांकाच्या मोटरसायकलने गुरुकुंज मोझरी येथून विरुद्ध दिशेने बायपास वळण मार्ग ओलांडून तिवसा मार्गे जात असतांना दरम्यान याच मार्गावरून येणार्या एम. एच. 31, डी 4788, क्रमांकाच्या कार ने, दुचाकीस जोरदार धडक दिली.
यात दुचाकीचालक व अन्य एक महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुःखापत झाली आहे. त्यांना उपचारार्थ अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक तपास तिवसा पोलीस करीत असून. गुरुकुंज मोझरी, ते शेंदोळाखुर्द,सहा किलोमीटर अंतरावर नव्याने जळ वाहतुकीसाठी पर्याय म्हणून तयार करण्यात आलेला बाय-पास वळण मार्ग हा दिवसेंदिवस अपघाताचे प्रणवस्थळ झाले असून या मार्गावर अपघाताचे प्रमाणा वाढले असून सध्यास्थितीत अत्यन्त धोकादायक हा वळण मार्ग तयार झाल्याचे दिसून येत आहे.




