फ्रेजरपुरा पोलिसांच्या जाळ्यात दोन कुख्यात चोर!

सात दुचाकी, दोन एलईडी टीव्ही जप्त

-सुमारे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अमरावती / 30 जुलै : फ्रेजरपुरा पोलिसांनी दोन कुख्यात वाहनचोरांना अटक करत मोठी कारवाई केली आहे. या चोरांकडून एकूण सात दुचाकी वाहनं आणि दोन एलईडी टीव्ही जप्त करण्यात आले आहेत. एकूण 3.90 लाखांचा मुद्देमाल हस्तगत झाला असून अनेक चोर्‍यांचा पर्दाफाश झाला आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी आकाश उर्फ कोब्रा विनोद कंगाले (28, आदिवासी नगर) आणि रितीक उर्फ मेहरा अशोक चव्हाण (29, सिद्धू नगर) हे आहेत. त्यांनी अमरावती शहरातील फ्रेजरपुरा, गाडगे नगर, नांदगाव पेठ, आर्वी व सिटी कोतवाली हद्दीतून वाहने आणि टीव्ही चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. या आरोपींनी राहुल नगर, यशोदा नगर, गाडगे नगर भागातून हिरो होंडा स्प्लेंडर, नांदगाव पेठ परिसरातून होंडा शाहीन व अ‍ॅक्टिवा, आर्वी येथून सुपर स्प्लेंडर व स्प्लेंडर तसेच सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सोनी 48 व मायक्रोटेक 21 एलईडी टीव्ही चोरले असल्याचे कबुल केले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपयुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त कैलाश पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट व निरीक्षक नीलेश गावंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यामध्ये पीएसआय राहुल महाजन, एएसआय योगेश श्रीवास, सूरज यादव, हरिश चौधरी, शशिकांत गवई, रोशन वर्हाडे, जयेश परीवाले आणि चालक उमेश चुलपार यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून, आणखी गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button