दोन दुचाकीच्या धडकेत दोघे जखमी

चालकाविरुध्द गुन्हा दाखल

वरुड । 23 सप्टेंबर – तालुक्यातील राजुरा बाजार ते वरुड रस्त्यावरील मौजा मोहनराव वानखडे यांच्या शेताजवळ दोन दुचाकींची धडक होऊन पुरुष व महिला जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नमूद घटनावेळी फिर्यादी प्रभाकर कृष्णराव गुडधे (वय 55, रा. गांधी चौक, राजुरा बाजार, ता. वरुड) आणि त्यांची पत्नी हे पत्नीच्या थेरपी उपचारासाठी वरुड येथे जात होते.

यावेळी मोटरसायकल क्रमांक एमएच 27 के 6373 च्या चालकाने निष्काळजीपणे व हलगर्जीपणे वाहन चालवत प्रभाकर यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे प्रभाकर आणि त्यांची पत्नी दोघेही रस्त्यावर पडले. यात प्रभाकर यांना डाव्या खांद्याला, छातीच्या डाव्या बाजूस आणि डाव्या पायाच्या गुडघ्याला मार लागला, तर त्यांच्या पत्नीला डाव्या डोळ्याच्या बाजूस, नाकाला, डाव्या खांद्याला आणि डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली.

या प्रकरणी प्रभाकर कृष्णराव गुडधे यांच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी मोटरसायकल क्रमांक एमएच 27 के 6373 च्या चालकाविरुद्ध भादंवि कलम 125 (अ), 281 भा.न्या.सं. 2023 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड पोलिस करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button