आरआर कंपनीच्या गोदामातील चोरी प्रकरणी दोघे जेरबंद

2.65 लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती / 4 जुलै: शहरातील गुलशन टॉवर परिसरात असलेल्या कोठारी यांच्या गोदामातून आरआर कंपनीचे एसी, केबल आणि अन्य लाखो रुपये किंमतीचे साहित्या चोरुन नेल्या प्रकरणात शहर कोतवाली पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चोरीची ही घटना सुमारे 1 महिन्यापूर्वी घडली होती. याबाबत कंपनीचे इंजिनिअर अभिषेक सुनील ढोके यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
शहर कोतवाली पोलिसांचे पथक या चोरी प्रकरणाचा तपास करित होते. दरम्यान या घटनेत अशीलदास सुरशेल पवार (22, रा. राजुराबेडा) आणि विक्की दिलीप भोसले (25, बैलोलपूर) यांचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी दोघांनाही अटक करुन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून आरआर कंपनीचा नेट केबल, केबल वायर, 1.5 एमएम मल्टीस्टँड केबल वायर आदी चोरीचे 2 लाख 65 हजार रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले. ही कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरिक्षक मनोहर कोटनाके, रामदास पालवे, पोलिस उपनिरिक्षक विजय गिते, रंगराव जाधव, हेकॉ हरीश बुंदेले, प्रमोद हरणे, आकाश इंगोले, सुकेशनी चक्रनारायण, मोनाली मोकलकर, आनंद जाधव यांच्या पथकाने केली.

संबंधित बातम्या

Back to top button