कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक जप्त, 52 गायींची सुटका
धानोरा (गु) जवळील घटना, ग्रामीण गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

अमरावती/23 नोव्हेंबर – ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलीसाठी गायी घेऊन जाणारा ट्रक पकडला. या ट्रकमधून 52 गोवंश जनावरे जप्त करण्यात आली असून 14 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. चालक आणि त्याचे साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
धानोरा गावाजवळ रात्री उशिरा संशयास्पद ट्रक येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नांदगाव खंडेश्वर हद्दीत सापळा रचून ट्रक थांबवला. तपासणी केल्यावर ट्रकमध्ये गायी एकमेकांवर कोंबून अमानुष पद्धतीने ठेवलेली आढळली. पोलिस पाहताच चालकाने ट्रक सोडून अंधारात पळ काढला. जप्त केलेल्या जनावरांची किंमत अंदाजे 6 लाख 40 हजार रुपये, तर ट्रकची किंमत 10 लाख रुपये असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सर्व जनावरे सुरक्षितपणे गोशाळेत हलवण्यात आली आहेत. या प्रकरणी चालक अशोक लँडगे (रा. चव्हाडा) याच्यासह अन्य अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनावरांची बेकायदेशीर वाहतूक व कत्तलीच्या कटात सामील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहिम सुरू केली आहे. कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक फैजुल काझी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीराम लांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उ.नि. विशाल राठोड आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी सहभागी होते. पोलिसांनी सांगितले की, जनावरांच्या बेकायदेशीर कत्तलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.सुरक्षितपणे गोशाळेत हलवण्यात आली आहेत. या प्रकरणी चालक अशोक लँडगे (रा. चव्हाडा) याच्यासह अन्य अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनावरांची बेकायदेशीर वाहतूक व कत्तलीच्या कटात सामील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहिम सुरू केली आहे. कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक फैजुल काझी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीराम लांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उ.नि. विशाल राठोड आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी सहभागी होते. पोलिसांनी सांगितले की, जनावरांच्या बेकायदेशीर कत्तलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.




